हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. अजिंक्य रहाणेची झुंजार शतकी खेळी आणि कल्पक नेतृत्वाने भारताने ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित केलं. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. दरम्यान, चाहत्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हेच आमच्यासाठी बक्षीस आहे असं भावनिक ट्विट कर्णधार अजिंक्य रहाणेने केलं आहे
अजिंक्यने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ” भारतातील ज्या व्यक्ती स्पोर्ट्स पाहतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलावण्याची ताकद भारतीय संघात नक्कीच आहे आणि आम्ही हे करू शकलो, याचे समाधान आहे. तुम्ही जे आम्हाला प्रेम दिले, ज्यापद्धतीने पाठिंबा दिला, ते आमच्यासाठी फार मोलाचे आहे. तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची आम्हाला नक्कीच गरज आहे. आगामी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये आम्ही अथक मेहनत घेऊ…”
Thank you 🙏 pic.twitter.com/tJdduct5Pl
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) December 30, 2020
गावस्कर यांनी केली अजिंक्यची स्तुती-
गावस्कर म्हणाले की, ” अजिंक्यच्या नेतृत्वाची स्तुती फक्त भारतीय नाही तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडूही करताना दिसत आहेत. जेव्हा भारतीय संघाने सामना जिंकला तेव्हा रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनीही स्तुती केली. यामध्ये माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट, माइक हसी आणि शेन वॉर्न यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. त्यामुळे अजिंक्यने फक्त भारताचीच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येकाची मनं जिंकली आहेत.”
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’