Tuesday, February 7, 2023

भर मैदानात विराटची सटकली! पृथ्वी शॉला दिली शिवी, नेमकं असं काय घडलं घ्या जाणून

- Advertisement -

एडिलेड । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहलीचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. कोहलीला राग अनावर झाला आणि त्याने पृथ्वी शॉ याला शिवी दिल्याची चर्चा चाहत्यांमध्यं रंगत होती. पृथ्वीने एक मोठी चुक केली, आणि कोहली संतापून पृथ्वीला अपशब्द याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

तर घडलं असं कि, २३व्या षटकात भारताचा जसप्रीत बुमरा गोलंदाजी करत होता. या षटकात बुमराने एक बाऊन्सर टाकला. या बाऊन्सरवर मार्नस लाबुशेनने पुलचा फटका मारला. त्यावेळी हा चेंडू हवे उडाला आणि पृथ्वी तिथे फिल्डिंग करत होता. पृथ्वीसाठी हा एक चांगला झेल होता. पण पृथ्वी यावेळी गडबडला आणि त्याने हा झेल सोडला. त्यानंतर कोहलीचा राग अनावर झाला आणि कोहलीने पृथ्वीला शिवी दिल्याची चर्चा चाहते करत होते.

- Advertisement -

पृथ्वी सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्याच्या बॅटमधून जास्त धावा निघत नाहीत. पहिल्या डावात तर पृथ्वीला भोपळाही फोडता आला नव्हता. त्याचबरोबर त्याला चांगली फिल्डींगही करायला जमत नसल्याचे यावेळी पाहायला मिळाले. लाबुशेनला यावेळी तीन जीवदान मिळाले. बुमरा आणि वृद्धिमाना साहा या दोघांनीही लाबुशेनला जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले.

https://twitter.com/Dip_D_Rocker/status/1339845214656032768?s=20

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या डे-नाइट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताची ६ बाद २३३ अशी स्थिती होती. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या अखेरच्या चार फलंदाजांना फक्त ११ धावा करता आल्या. भारताचा पहिल्या डाव २४४ धावांवर संपुष्ठात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’