‘भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जपानला मागे टाकेल’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक संकेत आहेत. IHS मार्किटने शुक्रवारी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, भारत 2030 पर्यंत आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी जपानला मागे टाकू शकतो. तोपर्यंत भारताच्या GDP चे आकारमान जर्मनी आणि ब्रिटनपेक्षा जास्त होऊन जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.

भारत सध्या जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे
IHS मार्किटने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये हे दशक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगले राहण्याची अपेक्षा आहे. भारत सध्या अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटननंतर जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.

भारत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल
या रिपोर्टनुसार, बाजार मूल्यावर भारताचा GDP 2021 मध्ये $2,700 अब्ज वरून 2030 पर्यंत $8,400 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या जलद वाढीसह, भारतीय GDP चा आकार 2030 पर्यंत जपानला मागे टाकेल, ज्यामुळे भारत चीन नंतर आशिया-पॅसिफिक प्रदेशातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

यासह भारताच्या GDP ने तोपर्यंत आकाराच्या बाबतीत जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनला मागे सोडलेले असेल. एकूणच, भारत पुढील दशकात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.

मध्यमवर्गीय देत आहेत बळकटी
या उच्च विकास दराला दीर्घकालीन दृष्टीकोनातील अनेक प्रमुख घटकांद्वारे सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. झपाट्याने वाढणारा मध्यमवर्गीय ग्राहक खर्चाला चालना देत आहे, ज्यामुळे 2030 पर्यंत देशाच्या ग्राहक खर्चा मध्ये दुप्पट वाढ होऊन ती $3 अब्जपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 8.2 टक्के असण्याचा अंदाज आहे.

Leave a Comment