विशेष प्रतिनिधी । ‘भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. मात्र हे वास्तव मान्य करण्याची सरकारची तयारी नाही. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपी वाढीचा दर ५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या ६ वर्षांमधील हा नीचांक आहे. तर बेरोजगारीच्या दरानं गेल्या ४५ वर्षांमधील उच्चांक गाठला आहे ”. असा घरचा आहेर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतींनी मोदी सरकारला दिला.
सीतारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी एका वृत्तपत्रासाठी लिहलेल्या लेखात “देशाची अर्थव्यवस्था संकटात असून त्यामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सरकारकड नसल्याच म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर आवश्यक पावलं उचलायला हवीत.
परंतु सध्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारकड काही ठोस रणनीती आहे असं मला वाटत नाही. भाजपाच्या नेतृत्त्वाला याची कल्पना असल्यानंच त्यांनी अर्थव्यवस्थेचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत उपस्थित केला नाही. त्याऐवजी त्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा हेच विषय केंद्रस्थानी ठेवले, अशा शब्दांमध्ये प्रभाकर यांनी भाजपाच्या लोकसभा निवडणुकीतील रणनीतीचं विश्लेषण केलं आहे.