टीम, HELLO महाराष्ट्र । गोड आणि खारी शंकरपाळी आपण नेहमीच बनवतो . चहाबरोबर आणि अगदी नुसती खायला सुद्धा शंकरपाळी छान वाटतात . म्हणूनच आज आपण वेगवेगळे शंकरपाळ्यांचे प्रकार पाहणार आहोत . ते घरी बनवून पहा आणि कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा . सर्वप्रथम आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहुयात .
साहित्य – मैदा , सनफ्लॉवर तेल , कसुरी मेथी , चवीनुसार मीठ
कृती – 1 वाटी पाणी घ्या त्याला पूर्ण उकळी आणा त्यात अर्धी वाटी सनफ्लॉवर तेल टाका….लगेच गॅस बंद करा…हे पाणी थंड होऊन द्या.पाणी थंड झाले की त्यात चवीनुसार मीठ टाका त्यात 2 ते 3 चमचे कसुरी मेथी टाका….त्यात मावेल इतका मैदा घाला…एकदम घट्ट भिजवा…. शंकरपाळे बनवा त्यात वरून तिखट थोडे मीठ टाका…आणि खा