भारताने जर्मनीला 5-4 ने पराभूत करत कांस्यपदक पटकावले; 41 वर्षानंतर हॉकीत पदक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कांस्यपदकाच्या लढतीत आज भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीचा 5-4 असा पराभव केला. 1980 पासून प्रत्येक ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतलेल्या या संघाला पदकाची प्रतीक्षा संपली. जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळविले. सुरूवातीला भारतीय संघ दुसऱ्या मिनिटाला मागे पडला. जर्मनीच्या तैमूर ओराजने जर्मनीसाठी पहिला गोल करत संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाच्या डिफेन्समध्ये चूक झाली

15 व्या मिनिटाला श्रीजेश समोर येऊन जर्मन खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न करत होता पण जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आला. एक एक करून जर्मनीला पेनल्टी कॉर्नर देण्यात आले. मात्र, भारताने त्यांना 2-0 अशी आघाडी करण्याची संधी दिली नाही. भारताने दूसरे क्वार्टरच्या शुरुवातीलाच गोल केला. सिमरनजीतला सर्कलच्या आतच बॉल मिळाला. त्याने बॉलला टर्न करत गोल केला आणि भारतीय संघाला जर्मनीशी बरोबरी करुन दिली.

26 व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, हरमनप्रीत सिंगचा ड्रॅग-फ्लिक जर्मन गोलरक्षकाने रोखलं पण हार्दिक सिंगने पुन्हा रिबाउंडवर गोल केला. यानंतर, संघाला 28 व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला 3-3 ची बरोबरी करुन दिली.

पहिला पूर्वार्ध संपला आहे. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीकडून सलग दोन गोल केल्यानंतरही भारतीय संघ दबावाखाली आला नाही आणि दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केल्यामुळे भारताने 3-3 अशी बरोबरी साधली. भारतीय हॉकीसाठी पुढील 30 मिनिटे अत्यंत महत्त्वाची आहेत

टीम इंडियाचं हॉकीमध्ये जर्मनीवर वर्चस्व असलेलं पाहायला मिळतंय. भारताने 5-3 अशी आघाडी घेतली आहे. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले आहेत. भारताने 31 व्या मिनिटाला चौथा गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रुपांतर केले. यानंतर सिमरनजीत सिंगने 34 व्या मिनिटाला गोल केला. या गोलसह भारताने जर्मनीवर 2 गोलची आघाडी घेतली आहे.

जर्मनीने चौथा गोल करत सामन्यात रंगत आणली होती. शेवटचे सहा सेकंद राहिले असताना जर्मनीला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र त्याचा फायदा भारतीय संघाने मिळवून न दिल्यामुळे जर्मनीची संधी वाया गेली. भारताने 41 वर्षानंतर हॉकी मध्ये पदक पटकावले.