Indian Idol 12- नवा एपिसोड नवा वाद; नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आदित्य नारायण आणि शन्मुखप्रिया

Indian Idol 12
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडियन आयडॉल १२ हा शो बहुतेक यंदा वादग्रस्त आयडॉल म्हणून प्रसिद्ध होणार आहे. नुकताच प्रसारित झालेल्या नवा एपिसोड देखील आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या एपिसोडवर पुन्हा एकदा प्रेक्षकांची टीकास्त्र उठली आहेत. कालच्या या एपिसोडमध्ये रूपकुमार राठोड, कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल असे दिग्गज गायक स्पेशल गेस्ट म्हणून आले होते. या एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यामुळे नदीम-श्रवण यांची अनेक रोमॅन्टिक गाणी सादर केली गेली. या दरम्यान शन्मुखप्रियाचा परफॉर्मन्स पाहून मात्र पुन्हा प्रेक्षकांनी नाराजीचा सूर धरला आहे. शन्मुख व आशीष यांनी ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ हे गाणे सादर केले. यानंतर नेटकऱ्यांनी शन्मुख प्रिया कृपा करून आमच्यावर दया कर आणि शो सोडून जा अश्या कमेंटन्स करीत तिला ट्रोल केले आहे. तर आदित्यने अमित कुमारांना लावलेला अप्रत्यक्ष टोला त्यालाच भारी पडला आहे.

शन्मुखप्रियाने एका सुंदर गाण्याची वाट लावली. हमको सिर्फ तुमसे प्यार है, या इतक्या सुंदर गाण्याचा बँड वाजवला. कुणीतरी तिला शोबाहेर हाकला.

या अश्या अनेक कमेंट्समधून नेटकरी शन्मुखप्रियाला शो मधून बाहेर करण्याची मागणी करत आहेत.

तर एका युजरने तिचे एक्स्प्रेशन पाहून तिला ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान म्हणत संताप व्यक्त केला. ‘बस कर बहेन रूलायेगी क्या़ निकलती क्यू नहीं तुम ओव्हर अ‍ॅक्टिंग की दुकान’, अशा शब्दांत एका तिला ट्रोल केले आहे.

यासोबत शोचा होस्ट आदित्य नारायणने किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांची अप्रत्यक्षणपणे खिल्ली उडवली. ते पाहून तर युजर्सच्या रागाचा भडकाच उडाला.

अमित कुमार यांच्यावर जाणीवपूर्वक खिल्ली उडवणा-या आदित्य नारायणाला जरा तरी लाज वाटायला हवी, असे एका युजरने लिहिले. तर अन्य एकाने लिहिले, शेम ऑन यू आदित्य नारायण आणि हिमेश रेशमिया. तुमच्यात अमित कुमार यांच्या ०.०००१ टक्केही टॅलेंट नाही.

अलीकडेच किशोर कुमार स्पेशल एपिसोड सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली होती. अमित कुमार यांनी शोबद्दल बोलताना म्हटले कि, स्पर्धक कसेही गायले तरीही त्यांचे कौतुकच करायचे आहे, असे मला सांगितले गेले होते. जे मला सांगितले तेच मी केले. हा खुलासा झाल्यानंतर शो चा टीआरपी घसरला.

याबाबत आदित्यने अमित कुमार यांना चांगलेच सुनावले होते. मात्र यानंतरही मेकर्सचा राग शांत झाला नाही. त्यामुळे या एपिसोड दरम्यान आदित्यने अमित कुमार याना अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘मी सानू दा, रूप कुमार राठोड व अनुराधाजींना एक प्रश्न विचारू इच्छितो की, त्यांनी मनापासून स्पर्धकांचे कौतुक केले की आमच्या टीमने करायला सांगितले म्हणून ते कौतुक करताहेत?,’ असा प्रश्न आदित्यने कालच्या एपिसोडमध्ये विचारला.

यात निश्चितच त्याने अमित कुमार यांचे नाव घेतले नाही. पण त्याचा इशारा त्यांच्याकडेच होता, हे कुणालाही कळल्यावाचून राहिले नाही. पण हा टोला अखेर आदित्यवर चांगलाच भारी पडला आहे.