Indian Idol 12 शोच्या परीक्षकांनी दिला शूटिंगसाठी नकार; विशाल दादलानीचा धक्कादायक निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडॉल १२’ या शोच्या बाबतीतील वाद काही थांबता थांबत नाही आहेत. अश्यावेळी मेकर्सच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे. दरम्यान या शोच्या परीक्षकांनी आपल्या मर्जीने असा काही निर्णय घेतला आहे कि मेकर्सची पूर्ती हवाच निघाली आहे. शोचे शूटिंग दमणमध्ये करण्यासाठी जजेसने स्पष्ट नकार दिला आहे. तर या शोचा परीक्षक विशाल दादलानी याने याहीपेक्षा मोठा धक्का दिला आहे. त्याने सांगितले कि, आता इंडियन आयडॉल १२ मध्ये तो पुन्हा कमबॅक करणार नाही. अर्थात शो मध्ये आता तो पुन्हा दिसणार नाही. विशाल दादलानी मागील तीन सीझन या शोचे परिक्षण करत आहे. त्याच्यासोबत नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया अन्य परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/CKwckYEFUG8/?utm_source=ig_web_copy_link

महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर राज्यात शूटिंगला बंदी घालण्यात आली. त्यानंतर शोच्या निर्मात्यांनी शूटिंग दमणमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यावर विशाल दादलानीसह नेहा कक्कर आणि हिमेश रेशमियाने यांनी शूटिंगसाठी दमणला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत गीतकार मनोज मुंतशिर आणि गायक अनु मलिक पहायला मिळत आहेत. तर आता ‘इंडियन आयडॉल १२’ मध्ये नेहा कक्कर आणि अनु मलिक कधी कधी पहायला मिळतात. मात्र विशालने शोमधुन काढता पाय घेत शोमध्ये परतण्यास नकार दिला आहे.

https://www.instagram.com/p/CN1pW2kDiOH/?utm_source=ig_web_copy_link

ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही, किमान तोपर्यंत तरी तो पुन्हा शोमध्ये परतणार नाही. तर रिपोर्टनुसार, ‘इंडियन आयडॉल १२’चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने विशाल दादलानी शोमध्ये परतणार नाही, याबद्दल बोलताना सांगितले होते की, विशाल दादलानी मागील वर्षीच लोणावळामध्ये शिफ्ट झाला आहे. तेथे तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत राहत आहे. त्यांना लोणावळा वरून ड्राइव्ह करत दमणला जाणे आणि परत तेथून माघारी घरी येणे असे करायचे नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना कोरोना वायरस संक्रमण होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment