हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून इंडियन आयडॉल १२ हा सिंगिंग रिऍलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हा शो अत्यंत लोकप्रिय होता. मात्र अलीकडेच ह्या शोचा टीआरपी घसरताना दिसतो आहे. ‘इंडियन आयडॉल १२’ या सीझनमधील आदित्य-नेहाची फेक केमेस्ट्री असो किंवा मग सवाई भट्टची गरिबी.. हे काय ते कमीच म्हणून किशोर कुमार स्पेशल विकेंडची यात वर्दी लागली. या गोष्टींना घेऊन हा सीझन चांगलाच ट्रोल झाला आहे. आधी अमित कुमार यांनी पोलखोल केली. त्यानंतर आदित्य नारायणनेदेखील खोट्या केमेस्ट्रीचा पर्दाफाश केला. त्यानंतर आता इंडियन आयडॉलच्या पहिल्या सिजनचा विजेता अभिजित सावंत यानेही शोच्या फॉरमॅटबाबत राग व्यक्त केला आहे.
https://www.instagram.com/p/CPBPoJ2g7-q/?utm_source=ig_web_copy_link
गायक अभिजीत सावंतने ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,’ जर तुम्ही प्रादेशिक रिअॅलिटी शो बघाल तर प्रेक्षकांना स्पर्धकांच्या बँकग्राऊंडबद्दल कदाचित काहीच माहिती नसते. तिथले लोक फक्त गाण्यावरच लक्ष केंद्रित करतात. पण हिंदी रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांच्या दुःखद कहाण्यांची पूर्णपणे पूर्तता केली जाते. केवळ त्यावरच जास्त लक्ष केंद्रित केले आहे. अभिजीत म्हणाला, सध्या रिअॅलिटी शो निर्माते टॅलेंट पेक्षा जास्त या गोष्टीवर लक्ष देतात की त्याला बूट पॉलिश करता येतात, तो किती गरीब आहे.
https://www.instagram.com/p/BHjy2kABSHH/?utm_source=ig_web_copy_link
‘इंडियन आयडॉल ११’ सनी हिंदुस्तानीने जिंकला होता. वयाच्या १३ व्या वर्षी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर सनी कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी बूट पॉलिशचे काम करायचा. या मुलाखतीत अभिजीत त्याच्या करिअरबद्दल बोलताना म्हणाला, “आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणे बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असते. माझ्या बाबतीतही तेच घडले.
https://www.instagram.com/p/CK3VYPcjzBW/?utm_source=ig_web_copy_link
तर आता ‘इंडियन आयडल १२’ मध्ये पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल यांचा लव्ह अँगल दाखवला जातोय. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे देखील सांगतिले जातेय. पण हे सगळं खोटं असल्याचा खुलासा खुद्द शो चा होस्ट अर्थात आदित्य नारायण याने केला आहे. एका मुलाखतीदरम्यान तो म्हणाला कि, पवनदीप व अरूणिताचा लव्ह अँगल बनावटी आहे. त्यात काहीही सत्य नाही. दोघेही मुळीच रिलेशनशिपमध्ये नाहीत.
https://www.instagram.com/p/CPFr1E_hIeX/?utm_source=ig_web_copy_link
यामागे निव्वळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हा एकच उद्देश आहे. एक एपिसोड ९० मिनिटांचा असतो. त्या ९० मिनिटात स्पर्धकांच्या परफॉर्मन्सशिवाय आणखी काय काय दाखवले जाईल, हे ठरवले जाते. प्रेक्षकांनी कंटाळून चॅनल बदलू नये आणि त्यांचे मनोरंजन व्हावे, या एकाच हेतूने काही गोष्टी दाखवल्या जातात. पवनदीप आणि अरुणिता यांनी एकमेकांना छेडणे हादेखील मस्तीचाच भाग असतो. ते कोणीही सीरिअस घेत नाही.
https://www.instagram.com/p/COpc0RTK5bw/?utm_source=ig_web_copy_link
तर यापूर्वी किशोर कुमार स्पेशल एपिसोड दरम्यान किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार स्पेशल गेस्ट म्हणून इंडियन आयडॉल १२ च्या मंचावर उपस्थित होते. या एपिसोडमध्ये शोचे जज नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी किशोर कुमार यांची गाणी गायली होती. तर शोच्या सर्व स्पर्धकांनी किशोर कुमार यांची लोकप्रिय गाणी सादर केली होती. यानंतर प्रेक्षकांनी अत्यंत संताप व्यक्त करीत त्यांना ट्रोल केले होते. दरम्यान एका मुलाखतीत अमित कुमार यांनी शोबाबत बोलताना म्हटले कि, मला शो सुरु होण्यापूर्वी सांगण्यात आले होते कि, स्पर्धकांनी कशीही गाणी गेली तरी कौतुक करायचे, शिवाय मला गेस्ट म्हणून पैसे मिळणार होते म्हणून मी उपस्थित राहिलो. या सर्व प्रकारानंतर इंडियन आयडॉल या लोकप्रिय सिंगिंग रिऍलिटी शोचा टीआरपी बघता बघता घसरला आणि शो चा पुरता बॅंड वाजला आहे.