Indian Ocean Gravity Hole Location | समुद्र हा अनेकांना आवडतो. आपल्या देशाला चारी बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. हा अथांग समुद्र पाहायला अनेकांना आवडतो. परंतु समुद्र वरवर जरी उसळलेला दिसला असला, तरी समुद्राच्या पोटात अनेक रहस्य दडलेली आहेत. ती रहस्य जाणून घेण्यासाठी नेहमीच सगळ्यांमध्ये उत्सुकता असते. अगदी वैज्ञानिकांना देखील ही उत्सुकता असते. आपल्या भारतातील समुद्रात देखील असेच एक रहस्य दडलेले आहे.
या रहस्यचा शोध घेण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. अखेर आता शास्त्रज्ञाच्या या प्रयत्नांना यश आलेले आहे. आपल्या हिंदी महासागराच्या मधोमध एक मोठा खड्डा आहे. (Indian Ocean Gravity Hole Location) या खड्ड्याला ग्रॅव्हिटी होल असे नाव दिलेले आहे. हा खड्डा नेमका कसा निर्माण झाला? महाकाय समुद्राच्या मधोमध तयार झालेल्या खड्ड्याला नर्काचा दरवाजा असेही म्हटला जाते. परंतु हा प्रकार नेमका काय आहे? याचा संशोधकांनी शोध घेतला आहे..
महासागरात निर्माण झालेल्या या अनोख्या रचनेला ग्रॅव्हिटी होल असे म्हणतात. या भागात गुरुत्वाकर्षण इतकं कमी आहे की, पाण्यात 320 फूट खाली गेला आहे. त्यामुळे समुद्रामध्ये हा एक मोठा खड्डा तयार झाला आहे. संशोधकांच्या टीमने असे म्हटलेले आहे की, पृथ्वीच्या भूगर्भात जे असलेल्या लाव्हामुळे हा खड्डा निर्माण झालेला आहे. हा तोच मॅग्मा आहे. जो ज्वालामुखीच्या उद्रेकासाठी कारणीभूत ठरलेला आहे. या एका मोठ्या खड्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी सुपर कम्प्युटरचा देखील वापर केला आहे. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार असे सिद्ध झालेले आहे की, समुद्रात पडलेला खड्डा हा 14 कोटी वर्षांपूर्वीच निर्माण झालेला आहे. संशोधकांनी सांगितलेल्या माहितीनुसार एका प्राचीन महासागरामुळे ही संरचना तयार झालेली आहे, मात्र तो महासागर आता अस्तित्वात नाही.
महासागरात असणाऱ्या या मोठ्या खड्ड्याचा शोध 1948 मध्ये लागला होता. तेव्हापासून या खड्ड्याचा आणखी शोध घेण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. मागील अनेक वर्ष त्यांना यश मिळत नव्हते. शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार या खड्ड्याचे गूढ आत्तापर्यंत सोडवले गेले नाही. कारण याकडे नेहमी भौतिकशास्त्राच्या नियमाचे आधारे पाहिले जात होतं. पाच सुपर कम्प्युटरचा वापर करून शास्त्रज्ञांनी गेल्या 144 दशलक्ष वर्षात या ठिकाणी टेक्नो निक प्लेटची हालचाल झाली होती हे शोधून काढले.
शास्त्रज्ञांनी सुपर कम्प्युटरचा वापर करून या खड्ड्याचा शोध घेतला आणि त्यातून असे समजले की, गुरुत्वाकर्षणामुळे येथील डेन्सिटी अगदी कमी आहे. आणि प्लाजमा लूम्स या ग्रॅव्हिटी हॉलच्या खालील भागातून बाहेर येत आहेत. करोड वर्षांपूर्वी भारत कधीतरी आफ्रिका खंडाचा एक भाग होता. परंतु नंतर तो वेगळा होऊन युरेशियन टेक्नॉलॉजी प्लेटच्या दिशेने पुढे सरकला. अशाप्रकारे हिंदी महासागर तयार होऊ लागला. त्यानंतर समुद्र पातळी वितळू लागली. त्यामुळे अनेक वर्षापासून सतत असलेल्या उच्च घनतेच्या आवरणाच्या वितळणामुळे मोठ्या घनतेचे प्लाजमा प्लम्स बाहेर येऊ लागले. यामुळेच याच्या खालच्या भागात इतर समुद्रासारखी घनता नाही. येथील पाण्याची पातळी इतर ठिकाणांपेक्षा कमी झालेली आहे.