हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Indian Overseas Bank ने देखील आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देत फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी व्याजदरात वाढ केली आहे.
1 जानेवारी 2023 पासून नवीन दर लागू
Indian Overseas Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 1 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेने 2 कोटींपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. या बदलानंतर, बँकेने 7 ते 90 दिवसांच्या कालावधीच्या FD वरील व्याजदरात 75 बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे.
Indian Overseas Bank एफडीचे नवीन दर
7 ते 14 दिवस – 4.50%
15 ते 29 दिवस – 4.50%
30 ते 45 दिवस – 4.50%
46 ते 60 दिवस – 4.75%
61 ते 90 दिवस – 4.75%
91 ते 120 दिवस – 4.20%
121 ते 179 दिवस – 4.20%
180 ते 269 दिवस – 4.85%
270 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी – 5.25%
एक वर्ष < 2 वर्षांपेक्षा कमी (444 दिवस सोडून) – 6.40%
444 दिवस – 6.55%
एक वर्ष ते < 3 वर्षांपेक्षा कमी – 6.40%
3 वर्षे आणि त्याहून अधिक – 6.50%
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/Domestic_Rates
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये