Indian Overseas Bank चा ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार

Indian Overseas Bank
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Overseas Bank: गेल्या महिन्यात RBI कडून रेपो दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली. ज्यानंतर अनेक बँकांनी आपले व्याजदर वाढवून कर्ज महाग केले. आता या लिस्टमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आणखी एका मोठ्या बँकेचे नाव देखील जोडले गेले आहे. यावेळी Indian Overseas Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने आता विविध कालावधीसाठीच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 10 बेस पॉइंट्स किंवा 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. 10 जुलै 2022 पासून बँकेचे हे नवीन दर लागू होतील.

Indian Overseas Bank ₹1,000 crore capital support | Business News – India TV

Indian Overseas Bank कडून करण्यात आलेल्या या बदलानंतर आता MCLR आधारित व्याजदर 6.95 टक्क्यांवरून वाढीला 7.55 टक्के होतील. तसेच एका वर्षासाठीचा MCLR 7.45 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षासाठीचा MCLR देखील 0.10 टक्क्यांनी वाढवून 7.55 टक्के करण्यात आला आहे. आता बँकेकडून एक दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून 6.95-7.50 टक्के करण्यात आला आहे.

Explained: Why Indian Overseas Bank hit 20% upper circuit today - Business  News

EMI मध्येही वाढ होणार

MCLR वाढल्याने टर्म लोनवरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतांश ग्राहक कर्जे मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR मधील वाढीमुळे पर्सनल लोन, ऑटो आणि होम लोन महागतील. Indian Overseas Bank

Benefits Of A Personal Loan: How To Apply Online

MCLR म्हणजे काय ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्याच्या आधारावर बँकाकडून कर्जासाठीचा व्याजदर ठरवला जातो. 1 एप्रिल 2016 पासून RBI ने देशात MCLR सुरू केला. त्यापूर्वी सर्व बँकाकडून बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठी व्याजदर निश्चित केला जात असे. एप्रिल 2016 पासून बँका बेस रेटच्या जागी MCLR वापरत आहेत. आता MCLR मध्ये कोणतीही वाढ किंवा कपात झाल्यास त्याचा परिणाम नवीन आणि सध्याच्या कर्जदारांवर होतो. निधीची मार्जिनल कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट, कॅश रिझर्व्ह रेशो (CRR) आणि कालावधी प्रीमियमच्या आधारावर त्याची गणना केली जाते. Indian Overseas Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.iob.in/retail-credit-interest-rates

हे पण वाचा :

आता PAN-Aadhaar Link करण्यास द्यावा लागणार दुप्पट दंड, त्यासाठीची प्रक्रिया तपासा

Home Loan : कोणत्या बँकेकडून कमी व्याजदरात होम लोन दिले जात आहे ते जाणून घ्या

Stock Market : येत्या 2-3 आठवड्यात दुप्पट कमाई करण्यासाठी ‘या’ शेअर्समध्ये गुंतवा पैसे !!!

Business Idea : या ‘मसालेदार’ व्यवसायाद्वारे कमवा लाखो रुपये !!!

Credit Card चे पूर्ण लिमिट वापरत असाल तर आताच व्हा सावध… अन्यथा होऊ शकेल नुकसान !!!