हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : 3 ऑगस्ट (बुधवार) रोजी मेंटेनन्स आणि परिचालन समस्यांमुळे भारतीय रेल्वेने 120 गाड्या रद्द केल्या. याशिवाय 18 गाड्यांचे सोर्स स्टेशनही बदलण्यात आले आहे. तर 20 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. हे जाणून घ्या कि, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस आणि इतर कारणांमुळे रेल्वेकडून मोठ्या प्रमाणावर गाड्या रद्द करण्यात येत आहेत.
रद्द करण्यात आलेल्या या गाड्यांमध्ये मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर सारख्या गाड्यांचा समावेश आहे. रद्द करण्यात आलेल्या बहुतेक गाड्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पंजाब,आंध्र प्रदेश, तेलंगणा, नवी दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार आणि राजस्थान येथे जात आहेत. Indian Railway
अशा प्रकारे मिळवा रद्द करण्यात आलेल्या गाड्यांची माहिती
Indian Railway कडून वेबसाइटवर या रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट दिली गेली आहे. त्यामुळे, जर कोणाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर घर सोडण्यापूर्वी ट्रेनचे स्टेट्स जाणून घेणे महत्वाचे ठरेल. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट भारतीय रेल्वे आणि IRCTC च्या वेबसाइटवर दिली जाते. याशिवाय त्याची माहिती NTES App वरही उपलब्ध आहे. रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes वेबसाइटवर किंवा IRCTC वेबसाइट https://www.irctchelp.in/cancelled-trains-list/#list2 can वर जाऊन कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स पाहता येते. येथे आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरून ट्रेनची स्थिती कशी जाणून घ्यावी हे सांगत आहोत. Indian Railway
अशा प्रकारे ट्रेनचे स्टेट्स कसे तपासा ???
रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासण्यासाठी http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वेबसाईटला भेट द्या.
यावर Exceptional Trains हा पर्याय दिसेल. तो निवडा.
रद्द, री-शेडयूल आणि वळवलेल्या गाड्यांच्या लिस्टवर क्लिक करा.
येथे संपूर्ण माहिती मिळेल. Indian Railway
ट्रेन रद्द झाल्यास मिळणार पैसे परत
हे जाणून घ्या कि, ट्रेन रद्द झाल्यास प्रवाशांना रेल्वेकडून तिकिटाचे पैसे परत दिले जातील. तसेच ज्या प्रवाशांनी IRCTC वेबसाइटवरून ई-तिकीट बुक केले आहेत त्यांना तिकिटांच्या रिफंडसाठी काहीही करण्याची गरज नाही. ट्रेन रद्द झाल्यास हा रिफंड ज्यामधून पेमेंट केले गेले आहे त्या ग्राहकाच्या बँक खात्यात/क्रेडिट कार्ड/ई-वॉलेटमध्ये जमा केला जाईल. याबरोबरच रिझर्व्हेशन काउंटरवरून खरेदी केलेली तिकिटे कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन काउंटरवर ट्रेन सुटल्यानंतर 72 तासांपर्यंत रद्द केली जाऊ शकतात. जर प्रवाशाने स्वतःहून तिकीट रद्द केले तर IRCTC काही कॅन्सलेशन चार्ज रिफंडमधून कापते. प्रत्येक रिझर्व्हेशन कॅटेगिरीसाठी रद्द करण्याचे चार्ज वेगवेगळे आहेत. Indian Railway
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
महागाईचा झटका !! CNG आणि PNG दरात मोठी वाढ
ICICI Bank कडून कर्जावरील व्याजदरात वाढ, नवीन व्याजदर पहा
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज फक्त 50 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो रुपये !!!
Kisan Credit Card द्वारे स्वस्त दराने कर्ज मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज !!!