हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC च्या वेबसाइट वरून प्रवाश्यांना तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली जाते. ज्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करावा लागतो किंवा रेल्वे तिकीट बुक करण्यास उशीर झाल्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही अशा लोकांना तत्काळ तिकीट बुक करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना तत्काळचा पर्याय निवडणे भाग पडते. मात्र हे लक्षात घ्या कि, तत्काळमध्ये तिकीट बुक केल्याने आरक्षण मिळतेच असे नाही.
तुम्ही आता याप्रमाणे तत्काळ तिकिटे बुक करू शकता
तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. एसी कोचच्या डब्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून आणि नंतर स्लीपर किंवा नॉन एसी कोच किंवा क्लाससाठी 11 वाजल्यापासून तिकीट कापले जाते. तत्काळमध्ये तिकीट मिळवणे सोपे नाही. तत्काळमध्ये तिकीट काढायचे म्हणजे त्या दिवशी काढायचे. देशभरातील हजारो आणि लाखो लोकं एकत्रितपणे तत्काळ तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न करतात, मात्र केवळ काही लोकांनाच तिकिटे मिळतात. त्यामुळे तत्काळमध्ये कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी वेळेची महत्त्वाची भूमिका असते. Indian Railway
मास्टर लिस्ट कशी वापरायची ???
सर्वांत आधी https://www.irctc.co.in/ वेबसाइटवर जा.
वेबसाइटवरील ‘My Account’ वर जा आणि ‘My Profile’ वर क्लिक करा.
येथे तुम्हाला ‘Add/modify Master List’ चा पर्याय दिसेल.
येथे प्रवाशाचे नाव, जन्मतारीख, लिंग, बर्थ, भोजन इत्यादी एंटर करा.
त्यानंतर ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार होईल.
तिकीट बुक करताना ‘My Passenger List’ वर जा आणि थेट कनेक्ट करा.
नंतर पेमेंट पर्यायांपैकी एक निवडा आणि पेमेंट करा. Indian Railway
हे पण वाचा :
शेअर मार्केट मध्ये Pump and Dump द्वारे अशा प्रकारे केली जाते फसवणूक !!!
BSNL च्या ग्राहकांना धक्का ! कंपनीने ‘या’ 3 प्रीपेड प्लॅनमध्ये केला मोठा बदल
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ, नवीन भाव पहा
आता ‘या’ शेतकऱ्यांनाच दिला जाणार PM Kisan चा12 वा हप्ता !!!
Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार