Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. वेटिंग लिस्ट तिकीट असलेल्या प्रवाशांना आता आरक्षित डब्यात प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ पासून हा नियम अधिकृतपणे (Indian Railway) लागू झाला असून, नियमांचे पालन न करणाऱ्या प्रवाशांना दंड भरावा लागेल.
नवीन नियम काय आहे? (Indian Railway)
वेटिंग लिस्ट तिकीटधारक आता स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करू शकणार नाहीत.
अशा प्रवाशांना फक्त जनरल कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल.
नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांना दंड भरावा लागेल.
नियम तोडल्यास किती दंड?
एसी कोचमध्ये वेटिंग तिकीटवर प्रवास केल्यास ₹४४० दंड आणि ट्रेनच्या सुरुवातीच्या स्टेशनपासून पुढील स्टेशनपर्यंतचा भाडे भरावा लागेल.
स्लीपर कोचमध्ये प्रवास केल्यास ₹२५० दंड आणि पुढील स्टेशनपर्यंतचा भाडे भरावा लागेल.
रेल्वे बुकिंगसाठी एआयचा वापर (Indian Railway)
भारतीय रेल्वे आता तिकीट वाटपासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करणार आहे. यामुळे बुकिंग अधिक वेगाने आणि सुयोग्यरित्या होईल. जर तुम्ही वेटिंग तिकीट काढले असेल, तर आरक्षित कोचमध्ये चढण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. भारतीय रेल्वेच्या नव्या नियमांमुळे प्रवास अधिक नियोजित आणि सुव्यवस्थित होणार आहे.