Indian Railway Recruitment 2023 : रेल्वेमध्ये 2409 पदांसाठी भरती; पात्रता आणि पगार किती?

Indian Railway Recruitment 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Indian Railway Recruitment 2023  | आपल्याला सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा अनेक तरुणांची आहे. यासाठी ते दिवस रात्र प्रयत्न देखील करत आहेत. अशा तरुणांसाठी रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (Railway Recruitment Cell) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. आता लवकरच मध्य रेल्वेत शिकाऊ उमेदवारांची  2409 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 28 सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतील. rrccr.com या अधीकृत रेल्वे वेबसाईटवर जाऊन उमेदवारांना ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

कोणत्या पदांसाठी भरती (Indian Railway Recruitment 2023)

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवाराच्या 2409 जागा भरल्या जातील. यातील मुंबई क्लस्टरसाठी 1649 पदे, पुणे क्लस्टरसाठी 152, सोलापूर क्लस्टर 76 पदे, भुसावळ क्लस्टर 418 पदे तसेच, नागपूर क्लस्टरसाठी 114 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेत त्याला 50 टक्के गुण प्राप्त असावेत. तसेच त्याकडे आयटीआय प्रमाणपत्रही असावे.

रेल्वे रिक्रूटमेंट सेल पदाची अधिक माहिती

शिक्षण – मान्यताप्राप्त संस्थेमधून 10 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षे दरम्यान

मानधन – सुरुवातीला महिना 7 हजार

निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी मॅट्रिकमधील गुणांची टक्केवारी + ITI प्रमाणपत्र

अर्ज करण्याची वेबसाईटrrccr.com

परिक्षा शुल्क – 100 रुपये

अर्जाची अंतिम तारीख – 28 सप्टेंबर

आरआरसी सीआर अप्रेंटिस भर्ती 2023 ही 2409 रिक्त पदांसाठी (Indian Railway Recruitment 2023) होईल. अधिक माहितीसाठी उमेदवार rrccr.com साईट चेक करु शकतात. या पदासाठी इच्छुक उमेदवार 28 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी फक्त 100 रुपये फी आकारली जाईल. डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/एसबीआय चलन अशाप्रकारे परीक्षा शुल्क भरता येऊ शकते.