हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले. लांबच्या प्रवासामध्येही खिशाला परवडणारी म्हणून सर्वसामान्य माणूस कायम रेल्वेलाच पसंती देतो. भारतीय रेल्वेही नागरिकांना अनेक सुविधा देत असते. रेल्वेच्या अशाही काही सुविधा आहेत ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील. आज आम्ही तुम्हाला रेल्वे देत असलेली अशाच एका सर्व्हिस बाबत सांगणार आहोत जिचे नाव आहे रिटायरिंग रूम सर्व्हिस. आता हि सर्व्हिस नेमकी काय आहे? आणि याचा तुम्हाला जसा फायदा होतो हे आज आम्ही आपणास सांगतो.
जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास करता तेव्हा कधी कधी रेल्वे प्लॅटफॉर्म वर उशिरा येते. मग ते खराब हवामान असो, कधी कधी रेल्वेत बिघाड होतो, किंवा कधी कधी हिवाळ्यातील धुके किंवा पावसाचा फटका असेल. यामुळे प्लॅटफॉर्मवर ट्रेनला उशीरा होतो. अशावेळी प्लॅटफॉर्मवर रेल्वेचं वाट बघत उभं राहणे नक्कीच कंटाळवाणे वाटते. परंतु अशावेळी प्रवाशांना त्रास होऊ नये भारतीय रेल्वे रिटायरिंग रूम हि सुविधा घेऊन आली आहे. ही सुविधा म्हणजे एक प्रकारचे हॉटेल आहे जिथे तुम्ही कमी खर्चात काही तास राहू शकता आणि नंतर तुमची ट्रेन आली कि पुढील प्रवासासाठी जाऊ शकता
रिटायरिंग रूमच्या सुविधेसाठी प्रवाशांना चार्जेस पडतात. परंतु अन्य हॉटेल सारखं जास्तीचे पैसे तुम्हाला मोजावे लागत नाहीत. तुमची फक्त ३० ते ४० रुपयांमध्ये खोली बुक करू शकता आणि 12 ते 24 तास खोलीत आराम करू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटला भेट देऊन PNR नंबर टाकावा लागेल. तसेच यासोबत फोटो, ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आणि क्रेडिट कार्ड ही कागदपत्रेही दाखवावी लागणार आहेत
रूम बुक करताना तुम्हाला एसी आणि नॉन एसी असे २ पर्याय दिले जातात. यामध्ये तुम्हाला जी खोली योग्य वाटेल ती तुम्ही बुक करू शकता. परंतु ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म आहे त्यांनाच या सुविधेचा लाभ मिळू शकतो. वेटिंग तिकीट, कार्ड तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट असणाऱ्यांना रिटायरिंग रूमची सुविधा दिली जात नाही. मात्र, जर तुमच्याकडे ५०० किलोमीटर अंतराच्या प्रवासाचे जनरल तिकीट असेल, तर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला रूम बुक करायची असेल परंतु आधीच तुमच्यापुढे बाकीच्या प्रवाशांचा नंबर लागला असेल तर तुम्हाला वेटिंग वर थांबावे लागेल. अशावेळी जर कोणाचे बुकिंग रद्द झालं तर त्याबाबत तुम्हाला अपडेट मिळेल आणि मग त्याच्या जागी तुमचा नंबर लागले.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या बहुतेक अनेक नागरिकांना या सुविधेबद्दल माहितीच नाही, याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील अनेक रेल्वे स्थानकांवर अजून हि सुविधा सुरु झालेली नाही. परंतु मुंबई, दिल्ली आणि चेन्नईसारख्या प्रमुख रेल्वे स्टेशनवर तुम्हाला रिटायरिंग रूमची सुविधा मिळेल.