Indian Railways | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या भारतात प्रचंड मोठी आहे. त्यामुळे प्रवाश्यांना चांगल्या सुविधा कश्या मिळतील याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष असते. देशाचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा रेल्वेचा कायापालट करण्यात मोठे योगदान आहे. रेल्वे प्रवाश्यांना प्रवास हा सोयीचा तसेच परवडणारा व्हावा यासाठी 2019 – 20 या वर्षात तब्बल 59837 कोटी रुपयांची प्रवाश्यांच्या तिकिटावर सबसीडी दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
प्रवास करणाऱ्या प्रत्येक रेल्वे प्रवाश्याला 53% आहे सवलत- Indian Railways
संसदेत केरळमधील काँग्रेसचे खासदार अँटो अँटोनी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, भारतीय रेल्वे नेहमीच समाजातील सर्व स्तरांना स्वस्त सेवा देण्याचा प्रयत्न करते. भारतीय रेल्वेने 2019-20 या वर्षात प्रवाश्यांना तिकिटावर सवलत देऊ केली होती. ती आजही चालू आहे. तसेच रेल्वेने (Indian Railways) प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही सवलत 53 टक्के इतकी आहे. तसेच अपंग (दिव्यांगजन ) यांच्या श्रेणी चार, रुग्णांसाठी श्रेणी 11 आणि विध्यार्थ्यांसाठी 8 वी श्रेणी अश्या अनेक श्रेणीसाठी ही सुविधा सुरु आहे.
2022-23 मध्ये 18 लाख रुग्णांनी घेतला याचा फायदा
भारतीय रेल्वेने (Indian Railways) दिलेल्या या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक रेल्वे प्रवाश्यांनी याचा लाभ घेतला आहे. त्यामुळे ही संख्या 2022-23 मध्ये सुमारे 18 लाख रुग्ण आणि त्यांच्या एस्कॉर्ट्सनी या विशेष सवलतीचा लाभ घेतला. त्यामुळे याचा फायदा झालेला दिसून येतो.