Indian Railways : भारतातील ‘या’ 5 रेल्वे मार्गावरून प्रवास म्हणजे साक्षात स्वर्गाचा अनुभव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. त्यामुळे येथे ज्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा आहे. त्याप्रमाणे येथील निसर्ग सौंदर्यही एक नवीन अनुभव देऊन जातो. त्यामुळे अनेकजण ऋतूप्रमाणे निसर्गाची मजा घेण्यासाठी लोक फिरायला जातात. त्यामध्ये जर तुम्ही रेल्वे प्रवाशी शौकीन असाल आणि आणि तुम्हाला रेल्वेच्या माध्यमातून भारतातील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला असे काही रेल्वे मार्ग (Indian Railways) सांगणार आहोत, ज्याद्वारे प्रवास करणे म्हणजे साक्षात स्वर्गाचा अनुभव घेतल्यासारखा आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात….

1) कोकण रेल्वे मार्ग :

कोकण म्हनलं की सर्वांनाच आठवतो तो हिरवा शालू नेसलेला निसर्ग. या कोकण रेल्वे मार्गाचा विस्तार हा मुंबईमार्गे मंगळूरू पर्यंत झाला आहे. त्यामुळे निसर्गाची मजा घेत घेत हा प्रवास अधुक सुखकर होतो. मुंबई – गोवा यापैकी तुम्ही कोणत्याही ठिकाणी जात असलात तरी देखील तुम्हाला या निसर्ग सौन्दर्याचा आनंद घेता येतो. या मार्गावर तुम्हाला अरबी समुद्र आणि पश्चिम घाटाचे नयनरम्य दृश्य तुम्ही अनुभवू शकतात.

2) दार्जिलिंग हिमालयन रेल्वे:

ही एक टॉय ट्रेन असून ती सुंदर पर्वतामधून जाते. त्यामुळे कांचनजंगा पर्वाताचा अनुभव घेता येतो. दार्जिलिंग हिमालयन रेल्वे मार्ग (Indian Railways) हा तुम्हाला प्रवासाचा एक वेगळा आनंद देऊ शकतो. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नॅरोगेज रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करताना तुम्हाला निसर्गाचे सौन्दर्य पाहायला मिळते. येथील दृश्य पाहण्यासाठी देश – विदेशातून अनेकजण येतात. तसेच येथे चहाच्या बागा देखील तुम्हाला पाहायला मिळतील.

3) वाळवंटातील राणी : Indian Railways

हा रेल्वे मार्ग हा ओसाड जंगलातून जातो. तसेच जैसलमेर ते जोधपूर या रेल्वेमार्गावर गेल्यावर तुम्हाला असे एक ठिकाण दिसेल जिथे ओसाड वाळवंट जमीन, वाळूचे ढिगारे, वाळवंटातील वन्यजीव आणि आदिवासींचे सुंदर दृश्य अनुभवायला मिळेल. त्यामुळे तुमचा प्रवास हा सुखदायक होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते.

4) कांगडा व्हॅली रेल्वे :

अनेकांना रेल्वेचा प्रवास (Indian Railways) हा नेहमीच आवडतो. त्यामुळे रेल्वेचा प्रवास हा वेगळा आनंद देतो. मात्र जे व्यक्ती पाहिल्यांदा रेल्वेचा प्रवास करत असतील त्यांना देखील पुन्हा प्रवास करण्याची इच्छा होईल. कांगडा व्हॅली रेल्वे मार्ग हा भारतातील असा रेल्वे मार्ग आहे जो सर्वोत्तम रेल्वेपैकी एक आहे. असे म्हंटले जाते.   या मार्गावर तुम्हाला पर्वताचे मनमोहक दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल.

5) हिमालयीन राणी:

कालका ते शिमला हा रेल्वेमार्ग तुम्हाला प्रवासातील एक नैसर्गिक सौन्दर्याचा आनंद देते.  ज्यामध्ये तुम्हाला 20 रेल्वे स्थानके, 800 पूल, 103  बोगदे आणि 900 वळणे पार करून शिमल्यात पोहचवते.  त्यामुळे तुम्हाला निसर्गाच्छा एक वेगळाच अनुभव मिळतो. जो अविस्मरणीय असतो. त्यामुळे तुम्ही जर तिथे फिरायला जायचा प्लॅन करता असाल तर या रेल्वे मार्गावरून नक्की जा.