हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे नेहमी प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करून त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरवत असते. मात्र यावेळी भारतीय रेल्वेने अनोखा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे तो प्रवाश्यांसाठी नसून ट्रॅकवर येणाऱ्या हत्तीसाठी आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल बेस्ट सॉफ्टवेयर गजराज इंस्टॉल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
भारतीय रेल्वे अश्या काही ठिकाणाहून जाते जिथे हत्तींची संख्या जास्त असते आणि हत्ती अनेकदा रेल्वे रुळांवर येतात. रेल्वेच्या समोर अचानक हत्ती आल्यामुळे आतापर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत रेल्वे अपघातांमुळे 45 हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे मृत्यू टाळण्यासाठी भारतीय रेल्वे आता AI सॉफ्टवेअरचा वापर करणार आहे.
कसे काम करते ‘गजराज सॉफ्टवेअर’?
हत्तींची टक्कर रोखण्यासाठी ऑप्टिकल फायबर केबल (OFC) चा वापर करणारे स्वदेशी सॉफ्टवेअर विकसित करण्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. रेल्वे मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे गजराज सॉफ्टवेअर हे चिलखत प्रणालीप्रमाणे काम करते आणि रेल्वे चालकाला रेल्वे ट्रॅकवर हत्तींच्या हालचालींची माहिती आधीच देते, ज्यामुळे हत्तींना ट्रेनच्या पकडीत येण्यापासून रोखता येते. हे तंत्रज्ञान OFC लाईनमधील सेन्सर्सच्या मदतीने काम करेल. ज्यामुळे 200 किलोमीटर अंतरावरूनच हत्तीच्या पावलांचा अंदाज येऊन इंजिनमधील अलार्म पाहून रेल्वे चालकास तो अलर्ट मिळेल. ज्यामुळे हत्ती रेल्वे ट्रॅक वरून सुरक्षित जाऊ शकेल.
अनेक उपकरणाने युक्त आहे हे तंत्रज्ञान
हे सॉफ्टवेअर तयार करताना या प्रणालीमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि संपर्क यंत्रणा असे दोन स्वतंत्र स्तर ठेवण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान स्टेशन आर्मर, लोको आर्मर, आर्मर टॉवर, ऑप्टिकल फायबर केबल (ओएफसी), वायरलेस लोको टॉवर्स, ट्रॅक उपकरणे आणि सिग्नलिंग आर्मर सिस्टम अंतर्गत येतात. त्यामुळे हे अनेक उपकरणाने युक्त असे तंत्रज्ञान आहे.
700 किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गावर बसवले जाणार तंत्रज्ञान
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, आसाम, केरळ, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, तसेच छत्तीसगडचा काही भाग आणि तामिळनाडूमध्ये या AI-शक्तीवर चालणारी यंत्रणा बसवण्याची योजना आहे. हे तंत्रज्ञान 700 किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गावर बसवले जाणार आहे. ज्यामुळे हत्तीचे रक्षण केले जाईल आणि त्यांचे मृत्यू वाचवता येईल.