Indian Railways : जनरल तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर!! रेल्वेने आणली ‘ही’ खास सोय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा आपण पैशांच्या बचतीसाठी कमी अंतराचा प्रवास देखील ट्रेनने (Indian Railways) करत असतो. यावेळी आपण ट्रेनचे कोणतेही बुकींग न करता जनरल तिकीट काढून येत असतो. मात्र या तिकीटासाठी आपल्याला कितीतरी वेळ लाईनमध्ये उभे रहावे लागते.  मात्र आता भारतीय रेल्वेने आणलेल्या एका अँपमुळे या अशा लाईनमध्ये उभे राहणे बंद होणार आहे.

UTS अँप सेवेत- (Indian Railways)

भारतीय रेल्वे (Indian Railways) विभागाने त्वरीत बुकिंग करण्यासाठी एक अँप प्रवाशांच्या सेवेत आणले आहे. या अँपमुळे प्रवाश्यांना त्वरीत ट्रेनने जाण्यासाठी सीट बुक करता येणार आहे. तसेच प्रवाश्यांना कोणत्याही लाईनमध्ये उभे राहण्याची गरज पडणार नाही. या अँपचे नाव यूटीएस असे असून याचा फायदा फक्त रेल्वे प्रवासी जनरल तिकीटसाठी घेऊ शकतात. भारतीय रेल्वेचे यूटीएस हे अँप सर्व Android  फोनमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही Play Store  मध्ये यूटीएस असे जरी टाकले तरी ते अँप सहज उपलब्ध होऊन जाईल. या अँपमुळे घर बसल्या आपण जनरल तिकीट सहज बुक करु शकतो.

सर्वप्रथम हे अँप सुरु करण्यासाठी तुम्हाला जीपीएस परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे तुम्ही शहरापासून १० किलोमिटरच्या अंतरावर तिकीट बुक करु शकता. या अँपसाठी नाव, मोबाईल नंबर तसेच इतर आवश्यक माहिती भरावी लागणार आहे. तसेच तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी नंबर देखील पाठवला जाईल. सर्व नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा एक वेगळा आयडी अँपसाठी तयार केला जाईल. यामुळे तुम्ही सुरक्षितपणे तिकीट बुक करु शकता.

भारतीय रेल्वेने (Indian Railways) आणलेल्या या नवीन अँपचा वापर अनेकजण करताना दिसत आहेत. याचा फायदा देखील प्रवाश्यांना होत आहे. आजकाल लाईनमध्ये उभे राहण्यापेक्षा त्वरीत बुकींग करण्याला जास्त प्रधान्य देण्यात येते. त्यामुळे भारतीय रेल्वे (Indian Railways) करुन सेवेसाठी आणलेल्या या अँपचा अनेकजण वापर करताना दिसत आहेत.