हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वे (Indian Railways) ही प्रवासासाठी अतिशय चांगला पर्याय ठरते. खास करून लांबच्या पल्ल्याच्या प्रवासासाठी आपण रेल्वेलाच पसंती देतो. स्वस्तात प्रवास असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त असते. त्यामुळे प्रवाशांना जागा मिळवतानाच नाकीनऊ येतात. रेल्वेचा प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे अनेकजण लांबचा प्रवास करण्यासाठी रिजरव्हेशन करतात. त्यासाठी रेल्वेत स्पेशल डब्बे देखील असतात. मात्र अनेकजण रिजर्वेशनच्या डब्ब्यात चढतात आणि रिजर्व असलेल्या जागेवर येऊन बसतात. त्यामुळे रिजर्व केलेली जागा जाते आणि पैसे भरूनही त्या व्यक्तीस जागा भेटत नाही. मग अश्यावेळी अनेकजण भांडण करतात. परंतु असे न करता तुम्ही नेमकं काय करू शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रेल्वेची मदत घ्या- Indian Railways
तुम्ही रिजर्व केलेल्या जागेवर (Reserved Seats)बाकीचे लोक येऊन बसत असतील आणि सांगूनही जर उठत नसतील तर या लोकांसोबत भांडण न करत तुम्ही रेल्वेची मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाइल फोनमध्ये Rail Madad नावाचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यावरती तुमचा मोबाईल क्रमांक टाकून तुमचे खाते तयार करू शकता आणि तक्रार नोंदवू शकता. त्यामध्ये तुम्ही काढलेल्या तिकिटाचा PNR क्रमांक टाकून तुम्हाला येणाऱ्या ऍप्लिकेशनमध्ये तक्रारीचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही घटनेची माहिती तसेच तक्रारीचा प्रकार निवडून घडलेल्या घटनेबद्दल तपशीलवार माहिती भारतीय रेल्वेला पाठवू शकता.
TTE शी संपर्क साधू शकतात
याशिवाय जर तुम्हाला वाटत असेल की ही प्रक्रिया खूप मोठी आहे. तर तुम्ही सरळ TTE शी संपर्क साधून तुमची तक्रार करू शकता. आणि तुम्ही पैसे देऊन रिजर्व केलेली जागा तुम्हाला मिळू शकते आणि वाद घालण्याची गरज भासणार नाही. अशाप्रकारे जर रेल्वेमध्ये (Indian Railways) तुमच्या सीट वर येऊन कोणीही बसलं तरी कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.