हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे भारतातील (Indian Railways) प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. खिशाला परवडण्यापासून ते देशभरात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यापर्यंत – असंख्य कारणांमुळे भारतीय रेल्वे ही अनेकांची पहिली पसंती राहिली आहे. परंतु भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर (Jammu Kashmir) पूर्णपणे रेल्वेच्या माध्यमातून जोडलेले नव्हते. आता मात्र काश्मीरला रेल्वेच्या मार्गाने जोडण्यासाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला. ज्या अंतर्गत भारतीय रेल्वेने ” जम्मू – उधमपूर – कटरा – बनिहाल – श्रीनगर – बारामुल्ला ” (USBRL rail Project) रेल्वेमार्ग तयार करण्याचे ठरवले. यामुळे भारतीय रेल्वेशी काश्मीर जोडला जाणार आहे. ह्या प्रोजेक्ट वर वेगाने काम चालू असून आत्तापर्यंत कटरा ते बनिहाल ह्या 111 km मार्गाचे 95% काम पुर्ण झाले आहे.
काश्मीरला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाचा (Indian Railways) काही हिस्सा या अगोदरच लोकांसाठी सुरु करण्यात आलेला आहे. परंतु यातील श्रीनगरला जम्मू शहराशी जोडणारा हिमालयाच्या डोंगराळ भागातून जाणारा रेल्वेमार्ग अद्याप सुरु झालेला नाही. त्याच संदर्भात एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. जम्मू ते बारामुल्ला पर्यंत असलेल्या ह्या रेल्वेमार्गातील “बनिहाल ते सुंबल ” पर्यंतच्या रेल्वेमार्गाचे MIRB च्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये रेल्वे विभागाचे प्रमुख अधिकारी देखील उपस्थित होते. मुख्यत्वे ह्यात फिरोजपूर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रेल्वे विभागाच्या ह्या अधिकाऱ्यांनी चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पूलाचे देखील निरीक्षण केले आहे.
कटरा ते बनिहाल ह्या 111 km मार्गाचे 95% काम पुर्ण झाले आहे. बनिहाल ते सुंबल “पर्यंत 50 km चा रेल्वेमार्ग पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे बनिहाल पासून ते सुंबल पर्यंतचा रेल्वेमार्ग पुढील महिन्यात सुरु करण्यात येईल आणि या मार्गांवरून रेल्वे सुसाट वेगाने धावेल अशी आशा व्यक्त होत आहे.
USBRL Rail link Project काय आहे? Indian Railways
काश्मीरला भारताच्या मुख्य रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी 1992 मध्ये भारत सरकारने ह्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. हा संपूर्ण रेल्वे मार्ग 272 km चा असून जो की, उधमपूर पासून सुरु होऊन काश्मीर मधील बारामुल्ला येथे संपतो . हिमालयाच्या डोंगराळ भागातून जात असल्या कारणाने या मार्गांवर काम करणे तितकेच अवघड होते. तसेच ह्या मार्गाच्या संरक्षण व काश्मीरला भारताशी जोडन्याच्या महत्वामुळे 2002 मध्ये मा. अटल बिहारी वाजपेयी सरकारने या प्रोजेक्ट ला राष्ट्रीय प्रोजेक्टचा दर्जा दिला.
272 km मधील 161 km चे काम पूर्ण
आत्तापर्यंत USBRL प्रोजेक्टसाठी 37012.26 करोड रुपये खर्च करण्यात आले असून 272 km मधील 161 km चा रेल्वेमार्ग सुरु करण्यात आलेला आहे. उर्वरित रेल्वेमार्गाचे काम देखील पूर्णत्वाकडे गेलेले दिसून येत आहे.