Indian Railways भारतीय रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. अनेक लोक हे प्रवास करण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. उन्हाळ्यामध्ये प्रवासी संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत असते. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशावेळी जेवण मिळत नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते. मात्र आता रेल्वे विभागाने जनरल डब्यातील प्रवाशांसाठी त्यांच्या बजेटला परवडेल असे जेवण देखील उपलब्ध करून दिलेले आहे
रेल्वे विभागाने ( Indian Railways) जारी केलेल्या त्यांच्या निवेदनानुसार आता लांब पल्ल्याच्या 15 प्रमुख रेल्वे स्थानकांवर 20 रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी, कुर्डूवाडी या स्थानकांवर ही सुविधा आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
रेल्वेच्या या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ 20 रुपयात आता जेवण मिळणार आहे. आणि या संदर्भातला निर्णय रेल्वे विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे कमी खर्चात प्रवाशांना पोटभर जेवण करता येणार आहे.
या जेवणामध्ये 7 पुऱ्या आणि बटाट्याची भाजी असणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांना 50 रुपयात नाष्टा आणि दुपारचे जेवण देखील देता येणार आहे. म्हणजे पन्नास रुपयात तुम्ही दिवसभरात जेवू शकता. रेल्वे प्रवाशांना कमी पैशात पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 20 रुपयांना मिळणाऱ्या इकॉनोमी मिलमध्ये 7 पुऱ्या 175 ग्राम आणि सुक्या बटाट्याची भाजी तसेच लोणचे या सगळ्याचा समावेश असल्याने आता प्रवाशांना चांगले जेवण मिळणार आहे.
पन्नास रुपयांना मिळणाऱ्या फराळाच्या सहज जेवणाचे वजन 350 ग्रॅममध्ये असणार आहे. यामध्ये दक्षिण भारतीय भात, राजमा भात, खिचडी, कुलचे भटुरा छुलके, पावभाजी, मसाला डोसा देण्यात येईल. त्याचप्रमाणे तीन रुपयात पिण्याचे पाणी देखील देण्यात येणार आहेत. अशी माहिती रेल्वे विभागांनी दिलेली आहे. मागील वर्षी 51 स्थानकांवर सेवेची चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर रेल्वेने कार्यक्रमाचा विस्तार केला. आता 100 हून अधिक स्थानकांवर आणि एकूण 150 काउंटरवर आहेत.