हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खिश्याला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे (Indian Railways) . त्यातच भारताच्या कोणकोणत्याही कानाकोपऱ्यात जायचं असेल तर रेल्वेचा प्रवास हा आरामदायी आणि स्वस्तात मस्त असा असतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही आहे. त्यातच मागील काही दिवसापासून भारतीय रेल्वे आपल्या प्रवाश्यांसाठी नवंनवीन योजना, यात्रा घेऊन येत आहे. आताही रेल्वेने 31 ऑक्टोबरच्या आधी पुश-पुल ट्रेन (Push-Pull Train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अगदी कमी पैशात राजधानी एक्सप्रेसचा आनंद घेता येणार आहे. प्रवाशी राजधानी एक्स्प्रेसच्या वेगाने प्रवास करून त्यांच्या डेस्टिनेशनला पोचतील.
पुश- पुल ट्रेनचे रूप पूर्णपणे Non- AC
पुश पूल ट्रेन ही ऑक्टोबरच्या शेवटी सुरु करण्यात येणार होती. मात्र आत्तापर्यंत त्याचा रूट तयार झालेला नाहीये. ट्रेनचे असलेले 22 कोच हे पूर्णपणे नॉनऐसी स्वरूपात असणार आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले आहे की, ट्रेनच्या मागे आणि पुढे इंजिन लावले जाणार आहे. त्यामुळे ट्रेनचा सरासरी वेग 10 ते 15% वाढतो.
काय आहे वैशिष्ट्य- (Indian Railways)
पुश पूल यात्री ट्रेन ही पूर्णपणे नॉन ऐसी स्वरूपात असणार आहे. ही ट्रेन वेगाच्या बाबतीत राजधानी एक्स्प्रेस आणि शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे धावेल. सध्या सामान्य नॉन-प्रिमियम ट्रेन ताशी 110 किलोमीटर वेगाने धावतात. मात्र पूल- पुश रेल्वे ताशी 130 च्या स्पीडने धावेल. याशिवाय चार्जिंग पॉइंट लाइटिंगसारख्या इतर अनेक सुविधांचा विशेष माहिती म्हणून समावेश करण्यात येणार आहे. नॉन एसी पूल-पुश ट्रेनचे भाडे हे जनरल श्रेणी सारखेच असणार आहे.
पुश पूल ट्रेन नेमकी आहे तरी काय
पुश-पुल हे लोकोमोटिव्ह -हॉल केलेल्या ट्रेनसाठी (Indian Railways) एक कॉन्फिगरेशन आहे , जे त्यांना ट्रेनच्या दोन्ही टोकापासून चालवण्याची परवानगी देते, म्हणजेच ट्रेनमध्ये एक इंजिन मागील बाजूस आणि एक इंजिन समोर बसविले जाते. मग प्रत्येक टोकाला लोकोमोटिव्ह असो वा नसो. पुश-पुल ट्रेनमध्ये ट्रेनच्या एका टोकाला लोकोमोटिव्ह असते, जे काही प्रकारच्या रिमोट कंट्रोलद्वारे जोडलेले असते, जसे की मल्टी-युनिट ट्रेन कंट्रोल , ट्रेनच्या दुसऱ्या टोकाला कंट्रोल कॅबने सुसज्ज असलेल्या वाहनाशी जोडले जाते. हे दुसरे वाहन दुसरे लोकोमोटिव्ह किंवा अनपॉवर कंट्रोल कार असू शकते .
कशी चालते ही ट्रेन
ऐतिहासिकदृष्ट्या, स्टीम पॉवर असलेल्या पुश-पुल ट्रेन्समध्ये ड्रायव्हरला कॅबच्या शेवटी मूलभूत नियंत्रणे प्रदान केली जातात आणि घंटा किंवा इतर सिग्नलिंग कोड सिस्टीमसह इंजिनमध्येच असलेल्या फायरमनशी संवाद साधता येतो आणि त्यात उपलब्ध नसलेली नियंत्रणे समायोजित करण्यासाठी आदेश दिले जातात. कमी वेगाने, काही पुश-पुल ट्रेन गार्ड ऑपरेटिंग बेल कोडसह संपूर्णपणे इंजिनमधून चालवल्या जातात आणि जेव्हा लोकोमोटिव्ह ट्रेनला धक्का देत असते तेव्हा अग्रगण्य कॅबमधून ब्रेक लावतात.