नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन 1 एप्रिलपासून काही मार्गांवर नवीन गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. देशातील पुन्हा वाढती कोरोनाची प्रकरणे पाहता रेल्वे सोशल डिस्टेंसिगची पूर्ण काळजी घेत आहे. याशिवाय ट्रेनमध्ये जास्त गर्दी होऊ नये आणि लोकांना सहज जागा मिळवता येतील म्हणून अनेक स्पेशल गाडय़ा सुरु करण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. याशिवाय प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन रेल्वे वेळोवेळी स्पेशल गाड्या चालवते.
भारतीय रेल्वे एप्रिलपासून ओखा-तुतीकोरिन (Okha-Tuticorin), जबलपूर कोयंबटूर मार्गावर (Jabalpur Coimbatore routes) विकली स्पेशल गाड्या सुरू करणार आहे.
1. विकली स्पेशल ट्रेन Okha-Tuticorin
ट्रेन नंबर 09568 ओखा-तुतीकोरिन विकली स्पेशल ट्रेन ओखा येथून 00.55 वाजता सुटेल. शुक्रवारी 2 एप्रिल रोजी तुतीकोरिन येथे 4.45 वाजता पोहोचेल. त्याशिवाय ट्रेन नंबर 09567 ओखा विकली स्पेशल ट्रेन तुतीकोरिन येथून रविवारी 22.00 वाजता निघेल आणि ओखा येथे 03.35 वाजता पोहोचेल.
या ट्रेनमध्ये तुम्हाला एसी 2-टियर -1, एसी 3-टियर -4, स्लीपर क्लास -10, जनरल सेकंड क्लास-4 आणि लगेज-कम-ब्रेक व्हॅन – 2 डब्यांची सुविधा उपलब्ध आहे.
ही ट्रेन द्वारका, जामनगर, हापा, राजकोट, अहमदाबाद, नाडियाड, आनंद, वडोदरा, भरूच, सूरत, वलसाड, वापी, वसई रोड, कल्याण, पुणे, सोलापूर, कलाबुरागी, वाडी, रायचूर, मंत्रालय, अदोनी, गुंटकाल , अनंतपूर, धर्माराम. हिंदूपुर, कृष्णराजपुरम, बंगारपेट, सालेम, इरोड, करूर, दिंडीगुल, मदुराई, विरुधुनगर आणि सातूर येथे थांबेल.
या व्यतिरिक्त ट्रेन नंबर 09568 ओखा-तुतीकोरिन विकली स्पेशल ट्रेन खांबलिया येथेही थांबेल. ट्रेन नंबर .09567 तुतीकोरिन – ओखा विकली स्पेशल ट्रेनही कोविलपट्टी तसेच येलाहंका येथे थांबेल.
2. विकली सुपर फास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन (Jabalpur-Coimbatore )
ट्रेन नंबर 02198 जबलपूर-कोयंबटूर विकली सुपर फास्ट फेस्टिव्हल विशेष ट्रेन जबलपूरहून 11.00 वाजता सुटेल आणि कोयंबटूरला सकाळी 04.10 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 03.04.2021 ते 29.05.2021 पर्यंत धावेल. ट्रेन नंबर 02197 कोयंबटूर – जबलपूर विकली सुपरफास्ट फेस्टिव्हल विशेष ट्रेन कोयंबटूरहून 17.10 वाजता सुटेल आणि जबलपूरला 08.00 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 05.04.2021 ते 31.05.2021 पर्यंत धावेल.
ती कुठे कुठे थांबेल – नरसिंगपूर, गदरवाडा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बिंदूर, कुंडपुरा, कुंडपुरा. कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, शोरानूर आणि पलक्कड या ठिकाणी थांबेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा