हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) केलेला प्रवास सर्वात सुरक्षित आणि सुखकर वाटतो. आरामदायी आणि लांबच्या पल्ल्याची आपण कायमच रेल्वेला प्राधान्य देत आलोय. तसेच खिशाला परवडणारी असल्याने रेल्वेला सर्वांचीच पसंती असते. पण तुम्हाला रेल्वेचे काही खास नियम आणि किस्से माहिती आहेत का? नसतील माहित तर आम्ही तुम्हाला त्यातला तुमच्या उपयोगाचा किस्सा सांगतो. भारतीय रेल्वे फक्त एका व्यक्तीसाठी संपूर्ण ट्रेन सोडेल का? तर तुमच्यापैकी बरेच जण नाहीच म्हणतील पण असं घडलंय . सप्टेंबर 2020 मध्ये भारतीय रेल्वेने फक्त एका महिलेसाठी संपूर्ण एक्सप्रेस ट्रेन चालवली . हे प्रकारण नेमकं काय आहे तेच आज आपण जाणून घेऊया.
काय होता किस्सा? (Indian Railways)
सप्टेंबर 2020 मध्ये रांची येथे जाणारी राजधानी एक्सप्रेस समोर होत असलेल्या ” ताना भगत्स आंदोलनामुळे ” दालतोंगंज येथे थांबवण्यात आली. हे अंतर रांची शहरांपासून 308 km आहे. ट्रेन अचानक थांबावल्यामुळे ट्रेन मधील 930 प्रवाश्यांसाठी रेल्वेने बसने जाण्याची सोय केली. रेल्वेने केलेल्या सोयीचा राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) मधील 929 प्रवाश्यांनी फायदा घेत आपले डेस्टिनेशन गाठले मात्र एक्सप्रेस मधील एका महिलेने बसने जाण्यास नकार दिला. रेल्वे विभागाच्या (Indian Railways) अधिकाऱ्यांनी महिलेला समजावण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु महिलेने नकार दिल्यामुळे एका महिला प्रवाश्याला रांचीपर्यंत पोहचवण्याकरिता राजधानी एक्सप्रेस चालवण्यात आली.
घडलेल्या घटनेवर महिलेला विचारले असता महिलेने स्पष्ट उत्तर दिले की, “मला जर बसने प्रवास करायचा असता तर मी रेल्वेचे तिकीट कशाला बुक केले असते . त्यामुळे रेल्वे विभागाने ही बाब लक्षात घेऊन माझा प्रवास पुर्ण केला. अश्या प्रकारची घटना घडणे खूपच दुर्मिळ आहे. आंदोलनामुळे अर्ध्या रस्तात राजधानी एक्सप्रेस थांबावण्यात आल्यामुळे हे घडू शकले. पण खास तुमच्या एकट्यासाठी संपूर्ण ट्रेन चालणे जरा कठीणच आहे.