हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उत्सुक असतात. कारण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुखकर असतो. आणि लांबच्या प्रवासाला सुद्धा तुमचा जास्त पैसा खर्च होत नाही. लहान मुलांना घेऊन सहसा आपण रेल्वेने प्रवास करत असतो. कारण रेल्वेने लहान मुलांना घेऊन प्रवास करणे जास्त सोयीस्करकर असते. परंतु भारतीय रेल्वेने लहान मुलांना घेऊन प्रवास करताना तुम्हाला काही महत्वाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे.
4 वर्षाखालील मुलांच्या तिकिटाची आवश्यकता असेल? (Indian Railways)
रेल्वेच्या (Indian Railways) प्रवासासाठी तुम्ही जर 1 ते 4 दरम्यानचे वय असणाऱ्या मुलांना घेऊन प्रवास करणार असाल तर तुम्हाला रेल्वेच्या नियमानुसार तुमच्या सोबतच्या लहान मुलासाठी वेगळे पैसे देऊन तिकीट घेण्याची आवश्यकता नसते . तुम्ही जर तुमच्या 1 ते 4 दरम्यानचे वय असणाऱ्या मुलासाठी खास वेगळी सीट बुक करणार असाल तर मात्र तुम्हाला तुम्हाला तुमच्या मुलाच्या तिकिटाचे पैसे देणे गरजेचे असणार आहे.
5 ते 12 वर्षादरम्यानच्या मुलांचे तिकीट काढाच :
प्रवासासाठी तुम्ही तुमच्या 5 ते 12 वर्षांमधील मुलांना घेऊन तुमच्या सीटवर बसून जरी प्रवास करणार असाल तरी देखील तुम्हाला तुमच्या सोबतच्या मुलाच्या तिकिटाची अर्धी रक्कम भरणे आवश्यक असेल. जर प्रवासादरम्यान तुमच्या सोबतच्या मुलांसाठी विशिष्ट वेगळे सीट बुक करणार असाल तर तुम्हाला तिकिटाची रक्कम भरावी लागणार आहे. तुम्ही तुमच्या सोबतच्या मुलांच्या नावाने नोंद जर केली असेल तरी देखील तुम्हाला त्याच्या तिकिटाची रक्कम भरावी लागणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये देखील नियम लागू :
वंदे भारत एक्सप्रेस मध्ये प्रवास करताना देखील हीच नियमावली लागू असणार आहे. रेल्वेचे (Indian Railways) रेसेर्व्हशन सीट्ससाठी देखील 5 ते 12 वर्षादरम्यानच्या मुलांचे तिकीट घेणे अनिवार्य असेल.