Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय!! प्रवासी संख्या कमी असल्यास स्लीपर कोचचे रुपांतर होणार जनरल कोचमध्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाश्यांना स्लीपर कोचची संख्या कमी असल्यास त्या कोचमध्येही प्रवास करता येणार आहे. नुकतेच एखाद्या ट्रेनमधील स्लीपर कोचमध्ये प्रवासी संख्या कमी असल्यास त्या कोचचे रुपांतर जनरल कोचमध्ये करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. गेल्या 21 ऑगस्ट रोजी रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विशेषता दिवसा सुरू असणाऱ्या रेल्वे गाड्यांसाठी लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी होण्यास मदत होईल.

निर्णयामागील मुख्य उद्देश – Indian Railways

समोर आलेल्या माहितीनुसार, इथून पुढे ज्या ट्रेनमधील स्लीपर कोच मधील प्रवाशांची संख्या कमी असेल त्या कोचचे जनरल कोचमध्ये रूपांतर करण्यात येईल. या निर्णया मागचा मुख्य उद्देश, अतिरिक्त महसूल मिळवणे आणि लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना योग्य सुविधा देणे हा आहे. यापूर्वी जोपर्यंत ट्रेन सुटत नाही तोपर्यंत जनरल कोचचे तिकिट दिले जात होते. यामुळे जनरल कोचमध्ये प्रचंड गर्दी निर्माण व्हायची. याचा प्रवासांना देखील तितकाच त्रास व्हायचा. मात्र आता रेल्वे बोर्डाने दिलेल्या निर्णयामुळे या गोष्टीवर आळा बसू शकतो.

कोचमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी

दरम्यान, रेल्वेच्या (Indian Railways)  प्रत्येक कोचची मर्यादा ठरलेली असते. त्यानुसार, फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये 18 ते 24 प्रवासी, सेकंड क्लास एसी मध्ये 48 ते 54 प्रवासी, एसीमध्ये 64 ते 72 प्रवासी आणि स्लीपरमध्ये 72 ते 80 प्रवासी तर जनरल कोचमध्ये 90 प्रवासी अशी मर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र ही मर्यादा असताना देखील जनरल कोचमध्ये 90 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या एकाच कोचमध्ये जास्त गर्दी जमा होते. त्यामुळे ही गर्दी कमी व्हावी यासाठी आता स्लीपर कोचची संख्या कमी असल्यास त्याचे रूपांतर जनरल कोचमध्ये करण्यात येईल. ज्यामुळे जनरल कोचमधील प्रवासी स्लीपर कोचमध्ये प्रवासी करू शकते. यामुळे त्याचा प्रवास देखील सुलभ होईल.