व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Shaktipeeth Expressway : गोवा आणि नागपूरला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे उद्दिष्टे काय? 75 हजार कोटी खर्चून जोडली जाणार ‘ही’ देवस्थाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. या महामार्गामुळे अनेक छोटी मोठी शहरे आणि राज्य एकमेकांना जोडली गेली आहेत. आता असाच एक प्रकल्प उभारण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांना जोडण्यासाठी “शक्तीपीठ एक्सप्रेस वे” (Shaktipeeth Express Way) महामार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे नागपूर आणि गोवा यामधील अंतर कमी होईल. लवकरच शक्तीपीठ एक्सप्रेस वे चे बांधकाम सुरू करण्यात येणार असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती.

शक्तीपीठ एक्सप्रेसवेचे फायदे- Shaktipeeth Expressway

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत शक्तीपीठ एक्सप्रेस वेची चर्चा करण्यात आली. त्यानंतरच महाराष्ट्र आणि गोवा या दोन राजांना जोडण्यासाठी शक्तीपीठ एक्सप्रेस वे ची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. या महामार्गामुळे नागपूर आणि गोवा या दोन ठिकाणांचा 21 तासांचा प्रवास फक्त आठ तासांमध्ये करता येणार आहे. या महामार्गामुळे विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही परिसर एकमेकांशी जोडले जातील.

शक्तीपीठामुळे जोडली जाणार ‘ही’ देवस्थाने-

शक्तीपीठ महामार्गामुळे (Shaktipeeth Expressway) पवनार ते गोव्यातील पत्रादेवी ही महत्त्वाच्या देवस्थाने एकमेकांना जोडली जातील. तसेच, तुळजाभवानी, अंबाबाई, माहूर येथील रेणुका माता, अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अशी शक्तीपीठे देखील एकमेकांशी जोडली जातील. तर विठ्ठल कुमारी यासारखे पर्यटन स्थळे या महामार्गाशी कनेक्ट होतील. या कारणामुळेच नागपूर गोवा या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या महामार्गाला शक्तिपीठ असे नाव देण्यात आले आहे.

यासोबतच, सेवाग्राम, कारंजा लाड, माहूर, औंढा नागनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा नांदेड, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, लातूर, उस्मानाबाद तसेच कोल्हापूर येथील अंबाबाई, आदमापुर तीर्थक्षेत्र, कुणकेश्वर पत्रा देवी अशी तर सर्व देवस्थाने शक्तीपीठ महामार्गाची जोडली जाणार आहेत. यामुळे या देवस्थानांना भेट देणाऱ्या नागरिकांचा प्रवास देखील तितकाच सोपा होणार आहे. तसेच या महामार्गामुळे वेळेची बचत होईल.

शक्तीपीठ एक्सप्रेस वे माहिती

शक्तीपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) तब्बल ७६० किलोमीटर लांबीचा असेल. तर तो सहा लेनचा द्रूतगती महामार्ग बनले. या प्रकल्पावर तब्बल 75 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवास फक्त आठ तासात पार करता येईल. हा महामार्ग साधारणपणे 2028 ते 2029 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल. अद्याप याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. या महामार्गामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची शक्तीपीठे एकमेकांशी जोडली जातील. तसेच यामुळे व्यापार व आयात , निर्यात वाढीस मदत होईल. तसेच पुणे मुंबईतील नागरिकांना गोव्याला जाण्यासाठी मोठ्या शहरांना वळवून जावे लागणार नाही. ते सरळ शक्तीपीठ महामार्गाने गोव्याला जाऊ शकतील.