Indian Railways : अरे वा!! एका तिकिटावर करा 56 दिवस प्रवास; रेल्वेनी आणखी खास सुविधा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रवाशांना रेल्वेने (Indian Railways) किंवा बसने प्रवास करायचे म्हटले कि प्रत्येक एकाच स्थानकावर वेगवेगळी तिकीट काढावी लागते. प्रवाशांत जवळ जर हे तिकीट उपलब्ध नसले तर की टीसी रेल्वेतून खाली उतरवण्याची कारवाई करतो. खर तर, रोजच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकवेळा तिकीट काढायचे देखील जीवावर येते. त्या लांब रागेत रोज उभे रहा, तिकिट जपून ठेवा याचा प्रवाशांना देखील कंटाळा येतो. त्यामुळेच भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक सुलभ सुविधा आणली आहे. या सुविधेत आता प्रवाशांना 56 दिवसांपर्यंतचे तिकीट एकाच वेळी काढता येणार आहे.

भारतीय रेल्वेची सुविधा काय? Indian Railways

भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी प्रवासी पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करतात. या सर्व प्रवाशांना रेल्वेचे प्रवास (Indian Railways)  करताना रोज नविन तिकिट काढावे लागते. यामुळेच ही रोजची कटकट मिटवण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक उत्तम सुविधा आणली आहे. या सुविद्या अंतर्गत प्रवासी एकाचवेळी 56 दिवसांचे तिकीट काढू शकतात. हे तिकीट काढल्यानंतर त्यांना 56 दिवस कोणत्याही अडथळ्या शिवाय रेल्वेने प्रवास करता येऊ शकणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला जम्मूपासून प्रवास सुरू करायचा आहे आणि तुम्हाला कन्याकुमारी गाठायचे आहे.आणि या प्रवासात तुम्हाला या मार्गात येणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांनाही भेट द्यायची असेल तर तुम्ही ट्रेनमधून उतरून फिरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला रेल्वेला आधीच कळवावे लागेल, त्यानंतर तुम्ही पुन्हा तिकीट न घेता या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

तिकिट कुठे काढता येईल?

एखाद्या प्रवाशाला जर 56 दिवसांचे तिकीट काढायचे असेल तर त्याला रेल्वेच्या (Indian Railways) जवळच्या केंद्रावर जाऊन तिकीट काढावे लागेल. हे तिकीट काढताना तुम्हाला तुमचा रोजचा जो काही रूट आहे तो सांगावा लागेल. हे तिकिट काढण्यासाठी लागणारी माहिती तुम्ही दिल्यानंतर आणि त्याचे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला 56 दिवसांचे तिकीट उपलब्ध करून दिले जाईल. या तिकिटावर तुम्ही रोजचा प्रवास कोणत्याही वेगळे न तिकीट काढता करू शकता. 56 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने तिकिट काढावे लागेल.

बसचा पास

राज्यात परिवहन महामंडळाकडून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पास सुविधा पुरवली जात आहे. या सुविधेमध्ये देखील बसणे प्रवास करणारा प्रवासी एक महिन्याचा किंवा एका वर्षाचा एसटी पास काढू शकतो. या पासच्या दारावर तो विना तिकिट प्रवास करू शकतो. या एसटी पासची शाळकरी विद्यार्थ्यांना देखील सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे हा एसटी पास रोजच्या तिकिटापेक्षा जास्त परवडतो.