हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारूच्या नशेमुळे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका महिलेवर 20 वर्षीय विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. या घटनेचं CCTV फुटेज समोर आल्यामुळे आरोपीचा छडा लागला. प्रीत विकल असे या सदर आरोपी विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळ भारतीय आहे. त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे.
प्रीत विकलने मद्यधुंद अवस्थेतील या महिलेला त्याच्या फ्लॅटवर नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. याबाबतचे CCTV फुटेज व्हायरल झाले आहेत. आपण या CCTV फुटेज मध्ये पहिले तर यामध्ये स्पष्ट दिसत आहे कि प्रीत विकल सदर महिलेला काळोख्या अंधारात उचलून घेऊन कुठेतरी जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळेच प्रीत विकलाची ओळख पटली आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
Preet Vikal, 20 ans, étudiant en ingénierie a transporté une jeune femme inconsciente, qu'il ne connaissait pas dans sa chambre après une soirée dans un club à Cardiff. Le lendemain il a dit qu'elle était consentante. https://t.co/01MJOnaumI https://t.co/oLGNEaQHM4 pic.twitter.com/qaGQHNd1Ai
— Euphorie ???? (@_Oct14th) June 17, 2023
याबाबत पीडित महिलेने सांगितले, गेल्या वर्षी जूनमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर तिला झोप सुद्धा लागत नव्हती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती मित्रांसोबत नाईट आऊटवर असताना आरोपी प्रीत विकलशी भेटली. त्यानंतर घरी एकटी जात असताना प्रीत विकलने तिला पकडले. आणि आपल्या खांद्यावर उचलून नेले, यानंतर प्रीतने नॉर्थ रोड भागातील एका फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात सदर विद्यार्थ्याला ६ वर्षे ९ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.