बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था – राष्ट्रकूल स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधनाच्या (Smriti Mandhana) तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. स्मृतीने या सामन्यात आपले अर्धशतक पूर्ण केले. तिने 42 चेंडूत 63 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 8 चौकांराचा समावेश आहे. या सामन्यात भारताने 8 गडी राखून विजय मिळवला आहे.
कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ आमने-सामने आले होते. यंदा कॉमनवेल्थ मध्ये महिला टी 20 क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारताने या मॅच मध्ये पाकिस्तानवर 8 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 100 धावांचे लक्ष्य भारताने दोन विकेट गमावून 11.4 षटकात पार केलं.
पाकिस्तानी फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिलं नाही
या सामन्यात पाकिस्तानची कॅप्टन बिस्माह मारुफने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा सामना पावसामुळे 20 ऐवजी 18 षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानची टीम निर्धारित 18 ओव्हर्स मध्ये 99 धावांवर ऑलआऊट झाली. भारताकडून स्नेह राणा, राधा यादवन प्रत्येकी दोन, तर रेणुका सिंह, मेघना सिंह आणि शेफाली वर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात पाकिस्तानकडून फक्त सलामीवीर मुनीबा अलीने 30 चेंडूत सर्वाधिक 32 धावा केल्या.
हे पण वाचा :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; पवारांचा मोठा निर्णय
हा तर ‘मविआ’च्या प्रामाणिक प्रयत्नांचा विजय; ओबीसी आरक्षणाबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया
मंत्रिपदासाठी 100 कोटींची मागणी; 4 जणांना अटक
हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय; कोर्टाच्या निकालानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया