देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । विजयादशमी दसरा देशभर उत्साहात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शस्त्रांचं, वाहनांचं पूजन करून, घराची, कार्यालयांची साफसफाई करण्यात लोकं व्यस्त असल्याचं पहायला मिळालं. झेंडूची फुले, आपट्याची पाने विकत घेण्यासाठी गावांतील तसेच शहरांतील रस्ते नागरिकांनी भरून गेले होते.

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. राज्यासह देशभरात अशा प्रकारचं संचलन पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग उपस्थित होते. एचसीएल कंपनीचे संस्थापक अध्यक्ष शिव नाडर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.