भारतीयांना भविष्यासाठी पैश्यांची बचत करण्यासोबतच ‘या’ ठिकाणी करायचा आहे खर्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय ग्राहक आपल्या कमाई आणि खर्चाबाबत आधी पेक्षा खूप सावध झाले आहेत. ते आता हुशारीने आणि केवळ जीवनावश्यक वस्तूंवरच खर्च करण्याला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली परिस्थिती पाहता आता ते भविष्यासाठी बचत करण्यावरही भर देत आहेत.

Deloitte ने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, भारतीय ग्राहक सावधगिरी बाळगून भविष्यासाठी जास्त बचत करत आहेत. यासोबतच त्यांना अनावश्यक खर्च कमी करून आपली कमाई आणि बचत यामध्ये संतुलन आणायचे आहे.

मनोरंजन आणि छंदांवर खर्च
या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतीय आपल्या शॉपिंग, एंटरटेनमेंट आणि छंदांवर खर्च करण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वेक्षण केलेले ग्राहक पर्सनल केअर आणि कपडे, छंद क्रियाकलाप, मनोरंजन आणि प्रवास यावर खर्च करण्याची तयारी करत आहेत. यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, होम फर्निशिंग आणि रेस्टॉरंटचा क्रमांक येतो.

आनंद आणि खर्चामध्ये समतोल
Deloitte म्हणाले की,” या विश्लेषणातून असे दिसून येते की, ग्राहकांच्या भावना आता सकारात्मक होत आहेत. ते आपला आनंद आणि खर्च यांच्यात समतोल साधण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न करत आहेत आणि भविष्यासाठी जास्त बचत करत आहेत.” Deloitte Touch Tohmatsu India LLP चे पार्टनर पोरस डॉक्टर म्हणाले की,” भारतीय ग्राहक आता भविष्यासाठी बचत करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.”

व्यावसायिकांना बिझनेस टूरवर जायचे आहे
या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, कॉर्पोरेट भारतात गोष्टी सामान्य होत आहेत आणि प्रवासावरील निर्बंध उठवले जात आहेत. अशा स्थितीत भारतीय व्यावसायिक टूरची तयारी करत आहेत. या सर्वेक्षणानुसार, सुमारे 83 टक्के भारतीय पुढील तीन महिन्यांत बिझनेस टूरवर जाण्याची शक्यता आहे. बहुतेक ग्राहक पुढील तीन वर्षांत आपल्या आर्थिक स्थितीबाबत आशावादी आहेत.

Leave a Comment