व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. अधिवेशन संपल्यानंतर आमदार, मंत्री आपापल्या मतदार संघात जाऊन कामे करू लागले आहेत. दरम्यान आज बारामती येथील एका कार्यक्रम प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीभ पुन्हा घसरली. “निधी वाटपाची जबादारी आमदार दत्ता भरणे यांच्याकडे सोपण्यात आली आहे. त्यामुळे मामा इतर आमदारांचाही विचार करत जा. मलाही निधी मागावा लागतो. इथल्या तिजोरीच्या चाव्या भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? देणार, “असे विधान पवार यांनी केले आहे.

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले की, बारामतीसह काही निधीवाटपाची सगळी सुत्र सध्या आमदार दत्ता भरणे यांच्याकडे सोपण्यात आली आहे. त्यामुळे मामा इतर आमदारांचाही विचार करत जावा. मलाही भरणेंना निधी मागावा लगतो. कारण इथल्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत.

बारामतीमधील निधीच्या तिजोरीच्या चाव्या भरणेंच्या हातात असल्या तरी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. मी तिजोरी नाही उघडली तर काय देणार “घंटा”? , पवार यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळातही चागलीच चर्चा रंगू लागली आहे.