भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ५८ टक्के – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण म्हणजेच रुग्णांचा रिकव्हरी रेट ५८ टक्के झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. याशिवाय देशभरात सध्याच्या घडीला जवळपास ३ लाख रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा ३ टक्के आहे, जो कि, अत्यल्प असल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण म्हणजेच डबलिंग रेट हा १९ दिवसांवर पोहचला आहे. लॉकडाउन च्या आधी हे प्रमाण ३ दिवसांवर होते अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेरीनुसार, मागील २४ तासांत देशात १८ हजार ५५२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या १५ हजार ६८५ इतकी झाली आहे. तर गेल्या ८ दिवसांपासून १४ ते १५ हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं १८ हजारांचा टप्पा ओलांडल्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दिलासादायक बाब म्हणजे, देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आधिक आहे. सध्या देशात १ लाख ९७ हजार ३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर २ लाख ९५ हजार ८८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment