देशातील पहिलं पाण्याखालील Metro Tunnel; 45 सेकंदाचा प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये देशातील पहिला पाण्याखालील मेट्रो बोगदा तयार होत आहे. (Underwater Metro Tunnel) पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग म्हणून सुमारे 120 कोटी रुपये खर्चून हुगळी नदीखाली हे टनेल बांधले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या डोळ्यांचे पारणे फीटणार आहेत.

520 मीटरचा हा बोगदा कोलकाताच्या पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा (Metro Corridor) एक भाग आहे. पूर्वेकडील सॉल्ट लेक सेक्टर V च्या IT हबपासून नदीच्या पलीकडे पश्चिमेला हावडा मैदानापर्यंत हा टनेल आहे. 520 मीटरचे अंतर अवघ्या 45 सेकंदात पार होईल. नदीच्या तळापासून 13 मीटर खाली आणि जमिनीच्या पातळीपासून 33 मीटर खाली हा बोगदा आहे.

भारतातील या पहिल्या पाण्याखालील (Underwater Metro Tunnel) बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि कॉरिडॉरवरील एस्प्लेनेड आणि सियालदाह दरम्यानचा 2.5 किमीचा पट्टा पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये तो सुरू होण्याची शक्यता आहे.

पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी बोगदा आवश्यक आहे आणि तो महत्त्वपूर्ण होता. निवासी क्षेत्रे आणि इतर तांत्रिक समस्यांसह नदी-संरेखन हे एकमेव संरेखन शक्य होते अशी माहिती कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक (सिव्हिल) शैलेश यांनी दिली. हावडा आणि सियालदह दरम्यानचा हा मेट्रो मार्ग 1.5 तासांच्या तुलनेत 40 मिनिटांनी कमी असेल. त्यामुळे दोन्ही टोकांना होणारी गर्दीही कमी होईल.