कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महामंदीचे सावट; GDP दर उणे होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मागील वर्षभरापासून सुरु असलेला मंदीचा फेरा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारकडून जाहीर होणाऱ्या GDP आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था यंदा उणे विकास दर नोंदवेल असा अंदाज यापूर्वीच काही संस्थांनी व्यक्त केला आहे. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत विकास दर (GDP) ३.१ टक्के राहिला. त्याआधी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत (GDP) ४.१ टक्के (सुधारित) होता. तर २०१९-२० या आर्थिक वर्षाचा विकासदर (GDP) ४.२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्याआधीच्या वर्षात तो ६.१ टक्के होता. दरम्यान, लॉकडाउनमुळे बंद पडलेले उद्योग आणि आधीच घटलेल्या मागणीत आता भविष्यात मागणी न वाढण्याची चिन्ह यामुळं यंदा उणे विकासदर नोंद होणार असे गृहीत धरले जात आहे.

कोरोनाने आधीच मंद गती असलेल्या अर्थचक्राला कोरोनामुळे आता पुराती खीळ बसली आहे. देशात २५ मार्चपासून कोरोना रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरु आहे. सध्या चौथा लॉकडाउन सुरु असून तो ३१ मे रोजी संपुष्टात येईल. मात्र या लॉकडाउन काळात जवळपास १२ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंद्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सरकारने कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी २० लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पॅकेज जाहीर केले आहे. दरम्यान, याचा लाभ अर्थव्यस्थेला किती होणार याबाबत आर्थिक विषयांच्या अभ्यासकांना शंका आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”