हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । India’s longest highway : देशात रस्ते विकासाची कामे जोरात सुरु आहेत. त्याअंतर्गत अनेक महामार्ग देखील बांधण्यात येत आहेत. यामधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 (NH-44) हा देशातील सर्वात मोठा महामार्ग ठरला आहे. जो सुमारे 11 राज्यांमधून जातो आहे. त्याची एकूण लांबी सुमारे 3745 किलोमीटर इतकी आहे. देशातील 21 प्रमुख शहरांना या महामार्गाद्वारे जोडले जाते. याआधी याला NH 7 म्हणूनही ओळखले जात असे.
तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून सुरू होणारा हा महामार्ग जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे संपतो. त्याचप्रमाणे तो महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून जातो. देशातील या सर्वात लांब महामार्गावर आपल्याला भारताच्या समृद्ध संस्कृतीची झलक पहायला मिळेल. यावरून बर्फाच्छादित पर्वत, सुंदर जिल्हे आणि विहंगम दृश्ये पाहायला मिळतील. India’s longest highway
याची खास बाब अशी कि, या महामार्गावर प्राण्यांसाठीचा भारतातील पहिला अंडरपास बनवला गेला आहे. जो मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्क इथे आहे. त्याची लांबी 750 मीटर आहे. तसेच हा महामार्ग ओळखता यावा यासाठी त्यांना क्रमांकही दिले गेले आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे देशातील बहुतेक राष्ट्रीय महामार्गांची देखभाल करते. India’s longest highway
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nhai.gov.in/
हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मधून फायदा मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..