हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (वैष्णवी पाटील) : भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने 2021 साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज सादर करण्यासाठी गणितीय मॉडेल्सच्या वापरावर भारताने जोरदार आक्षेप घेतला. मॉडेल्सची वैधता आणि डेटा संकलनाची पद्धत संशयास्पद असल्याचं भारताने म्हटलं आहे. शिवाय या सर्व गोष्टी करत असताना जागतिक आरोग्य संघटनेने आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही भारताने केला आहे.
भारताने म्हटलं आहे की डब्ल्यूएचओने (WHO) अतिरिक्त मृत्यूचे अंदाज जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या (WHO) अहवालानुसार कोविडमुळे किंवा आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व गोष्टींमुळे भारतातील सामान्य जनता मात्र संभ्रमात पडली आहे. एवढ्या फरकाच्या आकड्याने नेमका विश्व कुणावर ठेवायचा अशा गोष्टी आता निर्माण होऊ लागल्या आहे.