भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीला ट्रस्टकडून स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. भारत-चीन सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनंही मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे ही सर्वात महत्त्वाचं आहे, असं राम मंदिर ट्रस्टनं म्हटलं आहे.

राम मंदिर ट्रस्टनं भारत चीन सीमेवरील तणावाबाबत चिंता व्यक्त केली. तसंच नव्या तारखेचीही घोषणा करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती दिली. “मंदिराचे बांधकाम सुरू करण्याचा निर्णय देशातील परिस्थितीनुसार घेतला जाईल आणि अधिकृतपणे जाहीर केला जाईल,” अशी माहिती ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी पीटीआयशी बोलताना दिली. दरम्यान, यावेळी राम मंदिर ट्रस्टकडून जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. राम मंदिर प्रश्नी मागील वर्षी न्यायालयाकडून ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली होती.

दरम्यान, अयोध्येत विविध हिंदू संघटनांनी चीनविरोधात निदर्शने केली. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी चीनचा ध्वज जाळून आपला निषेध व्यक्त केला. तर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चीनचे अध्यक्ष शी. जिनपिंग यांचा पुतळा जाळत आणि चिनी बनावटीच्या वस्तू तोडून आपला संताप व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment