‘तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा’ इंदोरीकर महाराजांनी कार्यकर्त्यांना सुनावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – लोकप्रिय कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) हे नेहमी आपल्या कीर्तन आणि वक्तव्यमुळे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कीर्तनाचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी राज्यात गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे. चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.

काय म्हणाले इंदोरीकर महाराज?
‘फक्त लोभ नावासाठी अख्खी मंडळी 15 दिवस एकत्र आली. खुर्चीच्या लोभासाठी विरोधकही एकत्र आले, सगळे एकत्र आहे. कुणीही काही बोलायला तयार नाही. आपल्या गावातलं कुणी नाही, नाहीतर गेलो असतो लग्नाला. ते कसे रंगले आहे आता, मस्त निवडणुका काढल्या. शिका त्यांच्याकडून आता कुणी म्हणेल का हे विरोधक आहे का? तुम्ही आता नुसते दात कोरत बसा, तुमची तर किंमत संपली. तुम्हाला विचारलं का कुणी, असं काही करतो म्हणून. तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा, सतरंज्या झटका आणि मरा, तुम्हाला अशी लाज वगैरे नाही का? असं म्हणत इंदोरीकर महाराज (Indorikar Maharaj) यांनी कार्यकर्त्यांचेही कान उपटले आहेत.

‘आज जे चाललंय ते पंचांगने सांगितले होते. कालचं आणि आजचं जे सांगितलं होतं ते पंचागामध्ये सांगितलं होतं. कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही. माऊलींची पालखी पुण्यातून निघाली बातमी दिसत नाही. पाऊस पडला आहे, शेतकऱ्यांना बियाणं भेटत नाही, तो हवालदिल झाला आहे. पण, कुणालाच काही फरक पडत नाही.कुणीही दखल घेत नाही. सध्याची फक्त एकच ब्रेकिंग न्यूज ‘मीटिंग सुरू’, आताची महत्त्वाची बातमी आहे. खलबत…. लोकच बधीर झाले आहेत, तुम्हाला झालं काय नेमकं? असा सवाल इंदोरीकर महाराजांनी (Indorikar Maharaj) उपस्थितीत केला आहे.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू

Leave a Comment