नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि मोबाईल-आधारित पेमेंट सिस्टीमच्या प्रभावी रेग्युलेशनसाठी जागतिक स्तरावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की,”त्यांच्याकडे अशी कोणतीही यंत्रणा नाही ज्याद्वारे ते नियंत्रित केले जाऊ शकेल.”
Infinity forum मध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”आपण राष्ट्रीय स्तरावर विचार करत असतानाही जागतिक व्यवस्था असायला हवी. याद्वारे आम्ही तंत्रज्ञानातील बदलांवर सातत्याने लक्ष ठेवू शकू.” त्या म्हणाल्या की,” जागतिक सिस्टीम मधून क्रिप्टोकरन्सी असो किंवा तंत्रज्ञानाद्वारे पेमेंट असो, सर्वांवर एकाच सिस्टीमद्वारे लक्ष ठेवता येते.” त्या म्हणाल्या की,” सरकार क्रिप्टोकरन्सीवर विधेयक आणण्याच्या तयारीत आहे.”
Fintech बाबत Infinity forum ची दोन दिवसीय व्हर्चुअल मिटिंग आयोजित केली जात आहे. या मिटिंगचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या मिटिंगमध्ये 70 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
पंतप्रधान मोदींनी संबोधित केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, देशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी फिनटेक उपक्रमाचे फिनटेक क्रांतीमध्ये रूपांतर करण्याची गरज आहे. ते म्हणाले की,” फिनटेक उद्योगाचे प्रमाण जास्त व्यापक झाले आहे आणि त्याला लोकांमध्ये मान्यता मिळाली आहे.”
पीएम मोदी म्हणाले होते की,” तंत्रज्ञानामुळे फायनान्सिंग सेक्टरमध्ये मोठा बदल होत आहे आणि गेल्या वर्षी एटीएम कार्डमधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईल पेमेंट जास्त झाले होते.”
या कार्यक्रमात, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौरभ अग्रवाल म्हणाले की,” डिजिटल आयडेंटिटी सिस्टीम तयार करण्यासाठी जग इतर देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सहकार्य करण्याचा विचार करत आहे.”
UIDAI चे CEO सौरभ गर्ग यांनी Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यासोबत ‘Infinity मंच’ कार्यक्रमात पॅनल डिस्कशन दरम्यान ही माहिती दिली. ते म्हणाले की,”प्राधिकरण सुरक्षा वाढवण्यासाठी आणि आधार वापरून करता येणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढवण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा शोध घेत आहे.”