नवी दिल्ली । रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL CMD मुकेश अंबानी) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की,”भारत वेगाने डिजिटल होत आहे.” देशातील डिजिटल क्रांतीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना ते म्हणाले की,” आपले पंतप्रधान काळाच्या आधी विचार करतात. त्याचाच परिणाम म्हणजे आज आपल्याकडे आधार आहे आणि UPI सारख्या सुरक्षित सिस्टीम आहेत. त्यांच्या बळावर सर्वसामान्य माणूस बँकिंग व्यवस्थेत सामील होत आहे.” पंतप्रधानांचे जन धन खाते हे डिजिटल क्रांतीचे सर्वात मोठे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित केलेल्या इन्फिनिटी-फोरममध्ये मुकेश अंबानी म्हणाले की,”ज्यावेगाने जग डिजिटल होत आहे, त्याच वेगाने डिजिटल कचराही (Digital waste) निर्माण होत आहे.” ते म्हणाले की,”या डिजिटल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याला ठोस उपाययोजना शोधाव्या लागतील.”
रिलायन्स इंडस्ट्रीजचे CMD म्हणाले की,”आपल्याला पृथ्वी आणि लोकांच्या सुरक्षेवर आधारित डिजिटल जग तयार करायचे आहे. या डिजिटल जगात आपल्याला पर्यावरणाचाही ठळकपणे विचार करावा लागतो.”