हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Inflation : जर तुम्हांलाही एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण (वॉशिंग मशिन, रेफ्रिजरेटर किंवा टीव्ही) खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा. कारण खर्चात वाढ झाल्यामुळे कंपन्या लवकरच आपल्या होम अप्लायन्सेस आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सच्या किंमती वाढवणार आहेत.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात माल महाग (Inflation) झाला आहे. अशातच चीनच्या शांघायमधील लॉकडाऊनमुळेही कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. ज्यामुळे कंपन्या आता आपल्या इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सच्या किंमतीत 3 ते 5 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचार करत आहेत.
चीनमध्ये कोरोना महामारीमुळे पुन्हा गोंधळ उडाला आहे. यामुळे शांघाय शहरात कडक लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत शांघाय बंदरात अनेक कंटेनर जमा होत आहेत. या बंदरातून माल न आल्याने अनेक कंपन्यांना पार्ट्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. ज्यामुळे आयातीवर अवलंबून असलेली काही टॉप लाइन प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध होत नाहीत. Inflation
CEAMA चे अध्यक्ष एरिक ब्रेगान्झा यांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या मालाच्या किंमती आधीच वाढत आहेत. त्यात आता डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे आयात केलेल्या वस्तूही महाग होत आहेत. अशा परिस्थितीत आता कंपन्या नफ्यासाठी पुढील महिन्यापासून त्यांच्या उत्पादनांच्या किंमती ३-5 टक्क्यांनी वाढवू शकतात.
हेअर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष सतीश एनएस म्हणाले की,” शांघायमधील लॉकडाऊनमुळे कॉम्पोनंट्सचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचा मोठा परिणाम एअर कंडिशनर आणि फ्लॅट पॅनल टीव्हीवर होणार आहे. मात्र फ्रीझवर त्याचा परिणाम कमी होईल.” , यामुळे दरात मोठी वाढ होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://ceama.in/
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील आपल्या FD च्या व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Bank FD Rates : FD उघडाताय… जरा थांबा !!! कोण-कोणत्या बँका जास्त व्याज देत आहेत ते पहा
Guarantee-Warranty : गॅरेंटी-वॉरंटीमध्ये काय फरक आहे ??? अशा प्रकारे समजून घ्या
ICICI Bank कडून FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा