हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Injury Scars Removal Remedies) लहानपणी खेळताना, बागडताना ढोपर फुटणे, खरचटणे अशा छोट्या मोठ्या जखमा होतात. यातील बहुतेक लहान जखमा कालांतराने नैसर्गिकरित्या बऱ्या होतात. मात्र, जखमा झाल्याने उठणारे व्रण आणि त्यामुळे त्वचेवर पडणारे डाग काही केल्या जातात. वय वाढत जात मात्र हे डाग काही जाण्याचं नाव घेत नाहीत. कधी काळी झालेल्या किरकोळ जखमांच्या खुणा आयुष्यभर तशाच राहू नये म्हणून आपण किती काय काय उपाय करतो. मात्र, मनासारखे परिणाम मिळत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किरकोळ जखमांवर प्रभावी ठरणाऱ्या काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत.
या घरगुती उपायांच्या मदतीने न केवळ जखमा लवकर बऱ्या होतील. तर जखमांमुळे येणारे व्रण, खुणा आणि डागाचे अंश अजिबात उरणार नाहीत. शिवाय हे उपाय अत्यंत सोपे आणि कुणीही करू शकेल असे असल्याने यासाठी फार खिटपिट सुद्धा करायची गरज नाही. चला तर या प्रभावी नैसर्गिक आणि घरगुती उपायांविषयी जाणून घेऊया.
1. हळद (Injury Scars Removal Remedies)
हळदीतील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म जखमांवर प्रभावीपणे काम करते. शिवाय हळदीतील कर्क्युमिन बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते. तसेच हळदीतील अँटी फंगल आणि दाहक विरोधी गुणधर्म जखमा लवकर बऱ्या करतात आणि डागदेखील पडू देत नाहीत.
2. कोरफड
कोरफड ही औषधी वनस्पती विविध प्रकारे आरोग्यदायी ठरते. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्या शरीरासाठी चांगली असतात. शिवाय कोरफडमध्ये असणारा ग्लुकोमानन हा घटक सेल्युलर उत्पादनास मदत करतो आणि शरीरात कोलेजेनची मात्रा वाढवतो. यामुळे जखम लवकर बरी होते. (Injury Scars Removal Remedies) शिवाय जखमेमुळे उठणारे व्रण देखील नाहीसे होतात. खूप जुन्या जखमेचे व्रण सुद्धा कोरफडीच्या मदतीने कमी करता येतात. यासाठी एकतर ताजा गर वापरावा किंवा मग कोरफड जेलचा पातळ वा जेलमध्ये भिजवलेली पट्टी वापरता येईल.
3. मध
मध अत्यंत गुणकारी असून यातील अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म जखमेच्या उपचारांसाठी बरेच फायदेशीर आहेत. मध हे कोणत्याही जखमांच्या उपचारांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याची क्षमता ठेवते. (Injury Scars Removal Remedies) यातील बरेच घटक जखमेतील जिवाणूंची वाढ रोखते आणि संसर्गापासून बचाव करते. शिवाय जखमेमूळे व्रण देखील येऊ देत नाही. एखाद्या जुन्या जखमेचा डाग असेल तर तो लवकर कमी होण्यास मदत होते.
4. लसूण
लसणीतील अॅलिसिन गुणधर्म आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म जखमांच्या उपचारासाठी प्रभावीपणे काम करते. खास करून जळलेल्या वा पोळलेल्या जखमांवर उपचार म्हणून लसूण क्रीम चांगला मार्ग आहे. यामुळे जखमांचे डाग देखील राहत नाहीत. (Injury Scars Removal Remedies)