हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरने मृत्यू प्रकरण यामध्ये अनेक धक्कादायक पुरावे दररोज समोर येत आहे. रोज नवनवीन गोष्टींमुळं हे प्रकरण चर्चेत असते. एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin VazeCongress) यांच्या मुद्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विट करून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका केली आहे.
संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटवरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
संजय राऊत ने कहा है कि वे #सचिन_वज़े की पुलिस में दुबारा बहाली के खिलाफ थे।हालाँकि वे कल तक वज़े को ईमानदार और सक्षम बता रहे हैं।
फिर भी वे कौन-से नेता थे जिनके कंधे पर चढ़कर वज़े आया,यह बताना पड़ेगा।#NIA को राऊत जैसे बकबक करनेवालों को उठाकर वज़े के आकाओं तक पहुँचना चाहिए।— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 30, 2021
सचिन वाझे यांची काम करण्याची पद्धत वादग्रस्त आहे. त्यांच्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत येऊ शकते, असा इशारा मी वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले गेले, तेव्हाच दिला होता. शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना मी हे सांगितलं होतं त्यांची नावं उघड करू इच्छित नाही, असं संजय राऊत मुंबईत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. यावरून निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘वाझेंना पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता असं आता संजय राऊत म्हणतात. कालपर्यंत हेच राऊत वाझेंचं समर्थन करत होते. वाझे हे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी असल्याचं म्हणत होते. आता ते काहीही म्हणत असले तरी सचिन वाझे हा कोणाच्या पाठिंब्यानं पुन्हा सेवेत आला हे लोकांसमोर आलेच पाहिजे,’ असं निरुपम यांनी म्हटलं आहे.