‘या’ ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु, दहा लाख 70 हजाराच्या वसुलीचा आदेश असणारा रिपोर्ट पाठविला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील ग्रामपचांयतीच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सघंमताने केलेल्या भ्रष्टाचारा भक्कम पुराव्याचा परिणाम सकारात्मक झाला आहे. साळमळगेवाडी गावातील ग्रामस्थांनी दैनिक जनप्रवासचे स्वागत केले. तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर साळमळगेवाडी गाव आहे.

दोन हजार लोकसंख्या आणि सात सदस्यसंख्या असलेल्या या गावातील ग्रामपंचायतचा कारभारा एका पडक्या व्यायाम शाळेत चालतो. गावाला ग्रामपंचायत नाही. अशा अवस्थेत सरपंच व ग्रामसेवक या दोघांनी मिळून दहा लाख ७० हजाराचा गैरव्यवहार केल्याचा सिद्ध झाला आहे. मात्र कोरोना सारख्या महामारीच्या नावाखाली जत पंचायत समिती ही कारवाई करण्यात चालढकल करीत होती. अखेर या भ्रष्टाचार या विषयावर सदस्यांनी भांडाफोड केल्याने शासनाचे सूत्रे गती फिरली आणि दहा लाख ७० हजाराचे वसुलीच्या आदेश असणारा अहवाल जिल्हा परिषदकडे पाठविण्यात आला आहे.

जत शहरात लघुशंकेच्या युनिटचा पत्ता नाही मात्र साळमळगेवाडी गावात ७८००० खर्चाचे मुतारी युनिट बसवण्यात आले आहे. तर शौचालय युनिटवर ही ६५ हजारचा खर्च तर गावात साफसफाईसाठी दररोज कामगारावर दोन हजार रुपये खर्चचा तपशील या ग्रामपंचायतीने दाखवला आहे.

Leave a Comment