जाणुन घ्या जगप्रसिद्ध कंपन्याचे सीईओ मानसिक तणाव कसे हाताळतात

Worlds Top Company CEO
Worlds Top Company CEO
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

HelloHealth| दिवसभराच्या धकाधकीतून आपण सगळेच मानसिक ताणाला बळी पडतो. सुरुवातीस हा ताण एखाद्या चिमटीसारखा वाटतो परंतु कालांतराने याच तणावामुळे संपुर्ण शरीराची लाहीलाही होते. परिणामी, तुमचे स्वास्थ्य ढासळते, आनंद नाहिसा होतो. हा ताण कोणालाच नाही चुकला. जगप्रसिद्ध अब्जाधिशही याच तणावाला तोंड देतात. फक्त त्यांची यास सामोरे जाण्याची पद्धत निराळी असते. हे एवढेच कारण आहे त्यांच्या अद्वितीय यशाचे.

पाहुया तर जगातील या व्यक्ती मानसिक तणाव कसा हाताळतात ते.

१. शेरील सँडबर्ग

फेसबुकच्या सीईओ शेरील सँडबर्ग यांना रोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. एवढ्या मोठ्या कंपनीचा डोलारा सांभाळायचा म्हणजे ताण तर येणारच. म्हणून त्या रात्री झोपताना फोन बंद करुन झोपतात. जेणेकरुन त्यांना वारंवार ई-मेल आणि मेसेजस पाहण्यासाठी रात्री अपरात्री उठावे लागणार नाही.

२. जॅक डॉर्सी

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी सांगतात, ‘सहसा ताण अनपेक्षित घटनांतून निर्माण होतो. दिनक्रमातील कामांमध्ये जितके सातत्य असेल तितका तणाव कमी होतो.’ ते आपल्या दिवसाची आखणी आधीच तयार करुन ठेवतात. म्हणजे अवेळी येणाऱ्या अडथळ्यांमुळे चिडचिड होत नाही..

३. सुझॅन वॉचिस्की

व्यस्त दिनक्रमामुळे उद्योजकांकडे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. परंतु, युट्युबच्या सीईओ सुझॅन वॉचिस्की दिवसभरातला ताण दूर करण्यासाठी स्वतःसाठी वेळ राखून ठेवतात. यातून त्यांना फक्त मनःशांतीच नाही तर बऱ्याच प्रश्नांचा उलगडाही होतो.

४. टिम कूक

अॅपलचे सीईओ टिम कूक यांना समीक्षक जगातील सर्वात मोठी डोकेदुखी वाटते. आजकाल प्रत्येकजण आपले मत, विचार आणि समीक्षण समोरच्यावर लादत असतो. अशी बिनबुडाची बोलणी वेळीच दुर्लक्षित करावी नाहीतर ती आपल्या मेंदूत कॅन्सरसारखी जखडून बसतात. याने तुम्हाला भोवतालच्या नकारात्मकतेस डावलून प्रगती करण्यास मदत होते.

५. मेग व्हिटमन

P & G, eBay आणि ह्युलेट पॅकार्ड (Hewlett-Packard HP) यासारख्या नामवंत कंपन्यांच्या सीईओ राहिलेल्या मेग व्हिटमन सांगतात की, ताण कमी करण्यासाठी त्या आपल्या मुलासोबत फ्लाय फिशिंग करण्यासाठी जातात. संशोधनातही असे आढळून आलेय की अवांतर छंद जोपासल्याने मनावरील ताण कमी होतो.